ग्रामपंचायत कर्मचारी महा संघाची पाचोरा तालुका कमिटी गठित पाचोरा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पाचोरा तालुक्यात आज रामदेव लॉन्स ये...
ग्रामपंचायत कर्मचारी महा संघाची पाचोरा तालुका कमिटी गठित
पाचोरा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पाचोरा तालुक्यात आज रामदेव लॉन्स येथे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष भाऊ खरे, उप जिल्हा अध्यक्ष, राजेंद्र भाऊ खरे यांच्या उपस्थितीत पाचोरा तालुका समिती गठित करण्यात आली, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख म्हणून पत्रकार चंदू भाऊ खरे, पाचोरा तालुका अध्यक्ष पदी सुनील निकम आंबेवडगाव यांची करण्यात आली, उप तालुका अध्यक्ष, निलेश गोपाल खरे सचिव चेतन राजपूत, गौतम साळवी यांची नियुक्ती करण्यात आली असून पुढील ग्रामपंचायत कर्मचारी महा संघाची पाचोरा तालुक्याची जबाबदारी नवनियुक्त पदाधिकारी सांभाळतील अशी माहिती जिल्हा पदाधिकारी यांनी आपल्या भाषणात सांगितली या वेळी मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते

No comments