adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वन मजूर भागवत पाटील यांची १५ वर्षांची उत्कृष्ट सेवा; प्रजासत्ताक दिनी सन्मान

वन मजूर भागवत पाटील यांची १५ वर्षांची उत्कृष्ट सेवा; प्रजासत्ताक दिनी सन्मान  विश्राम तेले चौगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) कृष्णापूर ता. ...

वन मजूर भागवत पाटील यांची १५ वर्षांची उत्कृष्ट सेवा; प्रजासत्ताक दिनी सन्मान 


विश्राम तेले चौगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

कृष्णापूर ता. चोपडा येथील रहिवासी वन मजूर भागवत पाटील यांनी वैजापूर रेंजमधील बोराजंटी राऊंड येथे सलग पंधरा वर्षे निष्ठेने व प्रामाणिकपणे वन मजूर म्हणून सेवा बजावली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेसाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
दि. २६ जानेवारी २०२६ रोजी वैजापूर येथे आयोजित कार्यक्रमात वैजापूरचे वनक्षेत्रपाल विकेश ठाकरे, चोपडा येथील वनक्षेत्रपाल बी. के. थोरात यांच्या उपस्थितीत सहाय्यक उपवनसंरक्षक एम. बी. पाटील यांच्या हस्ते भागवत पाटील यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
वनसंवर्धन व संरक्षणाच्या कामात अनेक वर्षे मोलाची सेवा देणाऱ्या भागवत पाटील यांच्या कार्याची दखल घेत करण्यात आलेल्या या सत्कारामुळे परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

No comments