लासुर–चौगाव रस्त्यावरील धोकादायक झाड तात्काळ काढण्याची मागणी विश्राम तेले चौगाव: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यातील चौगाव–लास...
लासुर–चौगाव रस्त्यावरील धोकादायक झाड तात्काळ काढण्याची मागणी
विश्राम तेले चौगाव:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा तालुक्यातील चौगाव–लासुर रस्त्यावर दि. २७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी झालेल्या जोरदार वादळ व पावसामुळे रस्त्यावर एक मोठे झाड आडवे कोसळले असून त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सदर झाडामुळे रस्त्यावरून ये–जा करणाऱ्या वाहनचालकांना समोरून येणारी वाहने स्पष्टपणे दिसत नसल्याने मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, गेल्या पाच दिवसांपासून हे झाड रस्त्यावरच पडून असून संबंधित यंत्रणेकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक व वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर चौगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल पाटील यांनी सदर झाड तात्काळ काढून रस्ता वाहतुकीस खुला करण्यात यावा, अशी ठाम मागणी प्रशासनाकडे केली आहे. वेळेत उपाययोजना न केल्यास कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


No comments