चोपडा आगारात इंधन बचत अभियानाचे उद्घाटन चोपडा ( प्रतिनिधी) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारात दिनांक १६ ज...
चोपडा ( प्रतिनिधी)
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारात दिनांक १६ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात येणाऱ्या इंधन बचत मासिक अभियानाचे उद्घाटन आगार प्रमुख महेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.कार्यक्रमासाठी श्रीमती शरदचंद्रीका तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय चे एम एस पाटील,कमलेश पाटील,शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निर्देशक संभाजी क्षिरसागर, अनिल चव्हाण, उपस्थित होते. एम एस पाटील व संभाजी क्षिरसागर यांनी इंधन वाचविण्यासाठी चालकांनी घ्यावायची काळजी इंधन बचतीचे महत्त्व या बाबत चालकांना सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी चांगले के पी टी एल आणणारे विना अपघात सेवा देणारे चालकांचा सत्कार आगार प्रमुख महेंद्र पाटील व मान्यवरांचा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर महाजन यांनी सूत्रसंचालन भगवान नायदे यांनी केले.याप्रसंगी स का अ सिध्दार्थ चंदनकर वाहतुक निरीक्षक सागर सावंत लेखाकार ईश्वर चौधरी,संदिप पाटील, रिजवान सैय्यद, धनंजय पाटील,विजय सोनवणे,चंद्रभान रायसिंग रिना पाटील सविता कोळी राजश्री परदेशी, वृषाली बैसाणे, निर्मला सोनवणे सह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments