प्रस्थापितांच्या बालेकिल्ल्यात वंचितचा शिरकाव;हंगा येथे शाखा कार्यान्वित जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवण्याचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे ...
प्रस्थापितांच्या बालेकिल्ल्यात वंचितचा शिरकाव;हंगा येथे शाखा कार्यान्वित
जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवण्याचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांचे संकेत
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर : "लोकशाहीमध्ये जो बदल अपेक्षित आहे, तो सर्वप्रथम स्वतःमध्ये घडवा. आजच्या राजकारणाचे विदारक चित्र बदलण्यासाठी सामान्यांनी सत्तेची चावी हातात घेणे काळाची गरज आहे," असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी केले. पारनेर तालुक्यातील हंगा येथे वंचित बहुजन आघाडीच्या नूतन शाखेचे उद्घाटन योगेश साठे यांच्या हस्ते पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब पातारे होते. यावेळी साठे यांनी आक्रमक पवित्रा घेत आगामी जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले. ते म्हणाले की, "ॲड. प्रकाश आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यात वंचितला मोठे यश मिळत आहे. आपण नेहमी व्यवस्थेला आणि नेत्यांना दोष देतो, मात्र लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी मतदारांनी जागृत होणे आवश्यक आहे." यावेळी हंगा शाखेच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये शाखा अध्यक्षपदी गणेश सूर्यवंशी, तर सदस्य म्हणून किरण बर्डे, रोहिदास सूर्यवंशी, पुनीत आल्हाट यांची निवड करण्यात आली. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या सोहळ्याला जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, जिल्हा सल्लागार जे.डी.शिरसाठ,जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश क्षीरसागर,नेते फैरोज पठाण,तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड,राहुल घंगाळे,दीपक गायकवाड,राजेंद्र करंदीकर,आरपीआयचे राजू उबाळे,संतोष अडसूळ,अनंत श्रीमंडलीकर,विजय साळवे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय साळवे यांनी केले मनोज सूर्यवंशी यांनी आभार मानले.

No comments