वर्षभरांत 12 सापळे रचून 16 जणांवर गुन्हे दाखल, सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कामगिरी:- पोलीस उपअधीक्षक यास्मिन इनामदार ! सौ. शु...
वर्षभरांत 12 सापळे रचून 16 जणांवर गुन्हे दाखल, सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कामगिरी:- पोलीस उपअधीक्षक यास्मिन इनामदार !
सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सांगली जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील गतवर्ष 2025 मध्ये भ्रष्टाचार विरोधात धडक कारवाया करत तब्बल 12 सापळा कारवाया रचून लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींवर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागांच्या पोलीस उपअधीक्षक यास्मिन इनामदार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विविध शासकीय विभागांमध्ये केलेल्या कारवाई मध्ये महसूल विभागात सर्वाधिक 5 कारवायांत 7 तर पोलीस विभाग महानगरपालिका समाज कल्याण कृषी अधिकारी गृह निर्माण या विभागामध्ये प्रत्येकी 1 वेळा कारवाई करून प्रत्येकी एका व्यक्तींवर तर जिल्हा परिषद येथे 3 जणांवर तसेच एका खाजगी व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राज्य सरकारचे अधिकारी आणि कर्मचारी शासन अनुदानित मंडळे आणि संस्था महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत येथील लोकसेवकांकडून भ्रष्टाचार होत असल्याची माहिती असल्यास किंवा लाचेची मागणी केली जात असल्यास नागरिकांनी तक्रार करावी असे आव्हानही करण्यात आले आहे. किंवा तक्रार करण्यासाठी नागरिकांनी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय टोल फ्री. क्रमांक 1064 दूरभाष क्रमांक (0233/227395) भ्रमणभाष क्रमांक 9404041064 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सांगलीच्या पोलीस उपअधीक्षक यास्मिन इनामदार यांनी केले आहे.

No comments