adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पत्रकार दिनानिमित्त सावदा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया सल्ला शिबिराचे आयोजन

  पत्रकार दिनानिमित्त सावदा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया सल्ला शिबिराचे आयोजन   इदू पिंजारी (फैजपुर) (संपादक : हेमकांत गायकवा...

 पत्रकार दिनानिमित्त सावदा येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया सल्ला शिबिराचे आयोजन 

 इदू पिंजारी (फैजपुर)

(संपादक : हेमकांत गायकवाड)

सावदा, ता. रावेर | पत्रकार दिनाचे औचित्य साधून ओरिजनल पत्रकार संघ, सावदा व गोदावरी फाऊंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवार, दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत जेहरा मॅरेज हॉल, रावेर रोड, सावदा येथे संपन्न होणार आहे. या शिबिरामध्ये तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून सर्वसामान्य नागरिकांची आरोग्य तपासणी, तज्ज्ञ सल्ला तसेच आवश्यक उपचार मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना अंतर्गत पात्र रुग्णांना मोफत उपचारांचा लाभ मिळणार आहे.

आवश्यक कागदपत्रे :

रेशन कार्ड (पिवळे / केशरी / अन्नपूर्णा / अंत्योदय)

आधार कार्ड

आयुष्यमान भारत कार्ड (उपलब्ध असल्यास त्याची प्रत)

शस्त्रक्रियांचे प्रकार :

स्वादुपिंड (पॅनक्रियास) संबंधित शस्त्रक्रिया

छोट्या गाठी (ट्यूमर / सिस्ट) काढणे

मुळव्याध (पाइल्स)

हायड्रोसिल

अंडाशय शस्त्रक्रिया

भांड (हर्निया)

पित्ताशयातील खडे (गॉलस्टोन)

पायातील शिरा फुटणे (व्हेरिकोज व्हेन्स)

मूत्रपिंडाचे आजार

पोट व आतड्यांच्या शस्त्रक्रिया आदी

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा घराजवळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ओरिजनल पत्रकार संघ, सावदा यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन ओरिजनल पत्रकार संघाचे अध्यक्ष भानुदास भारंबे, उपाध्यक्ष दिलीप चांदेलकर, सचिव शेख फरीद, कार्याध्यक्ष युसुफ शहा, कैलास लवंगडे, प्रसिद्धी प्रमुख अजहर खान, दीपक श्रावगे, शेख मुखतार, प्रशांत सरवदे व अकरम खान यांनी केले आहे. या शिबिरास नगरसेवक, अधिकारी, स्थानिक पत्रकारांसह रावेर व यावल तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

No comments