adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी  विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक व क...

 क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

धरणगाव येथील इंदिरा गांधी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय येथे आधुनिक भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक व स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा पाटील होत्या. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा व स्त्रीशिक्षणावरील विरोधाला न जुमानता शिक्षणाचा दिवा प्रज्वलित केला, असे प्रतिपादन केले. आजच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या विचारांचा अंगीकार करून शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःसह समाज प्रगतीपथावर नेण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमासाठी आदर्श माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक संदीपकुमार सोनवणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या त्यागमय जीवनकार्याचा उल्लेख करत, स्त्री-पुरुष समानतेचा पाया शिक्षणानेच भक्कम होतो, असे मत व्यक्त केले. तसेच पर्यवेक्षक ए. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव ठेवून शिक्षण घेण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ शिक्षिका भारती पाटील यांनी केले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक चळवळीचा ऐतिहासिक आढावा घेत त्यांच्या कार्यामुळेच आज महिलांना शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आरती जैन यांनी अत्यंत प्रभावी व संयत शब्दांत केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जेष्ठ शिक्षक किरण चव्हाण यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे आभार मानले. हा प्रेरणादायी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले. या जयंती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची जाणीव निर्माण होऊन समाजसेवेची प्रेरणा मिळाल्याचे चित्र दिसून आले.

No comments