adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुकुंदनगर भागात गोवंशीय कत्तल रॅकेटचा पर्दाफाश;६१५ किलो गोमांसासह आरोपी अटकेत भिंगार कॅम्प पोलिसांची धडाकेबाज कारवाई

 मुकुंदनगर भागात गोवंशीय कत्तल रॅकेटचा पर्दाफाश;६१५ किलो गोमांसासह आरोपी अटकेत भिंगार कॅम्प पोलिसांची धडाकेबाज कारवाई  सचिन मोकळं अहिल्यानगर...

 मुकुंदनगर भागात गोवंशीय कत्तल रॅकेटचा पर्दाफाश;६१५ किलो गोमांसासह आरोपी अटकेत भिंगार कॅम्प पोलिसांची धडाकेबाज कारवाई 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर :-मुकुंदनगर भागात गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांसाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या टोळीवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याने मोठी कारवाई करत तब्बल ९ आरोपींना अटक केली आहे.या कारवाईत १,८९,१०० रुपये किमतीचे ६१५ किलो गोमांस, तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.दि.०२ जानेवारी २०२६ रोजी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना गुप्त माहिती मिळाली होती की, मुकुंदनगर भागात ब्लॅक बाजार भावाने गोमांसाची विक्री सुरू आहे.मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.तपास पथकाने मुकुंद नगर परिसरातील अभिलाषा कॉलनी व घासमार्गातील पोर्चमध्ये छापा टाकला असता गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करताना आरोपी रंगेहात सापडले. घटनास्थळी पंचनामा करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

इरफान आयुब कुरेशी गल्ली, झेंडीगेट,समीर शफीक कुरेशी, रिझवान मोहम्मद हुसेन कुरेशी, सोहेल रफीक कुरेशी, सोहेल इक्बाल कुरेशी रा.सदर बाजार भिंगार, अहिल्यानगर रिझवान आयुब कुरेशी, तसेच वसीम बागवान, वसीम टेवरा,आफरोज कुरेशी यांच्यासह एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.या कारवाईत ६१५ किलो गोमांस, लोखंडी सत्तूर, चाकू व कत्तलीसाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक काटे जप्त करण्यात आले आहेत.आरोपीं विरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक ०५/२०२६, ०६/२०२६ व ०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २७१, ३२५ तसेच महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम २०१५ मधील कलम ५(क), ९(अ) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार पांडुरंग बारगजे, लक्ष्मण खोकले, गणेश धोत्रे, शाहिद शेख, इस्माईल पठाण, दीपक शिंदे, रविंद्र टकले, प्रमोद लहारे, अहमद इनामदार, संदीप घोडके यांनी केली.

No comments