adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अवैध कत्तलखान्यांवर LCB छापा! महिनाभरात चौथी मोठी कारवाई ५ आरोपींवर गुन्हे दाखल तर 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

 अवैध कत्तलखान्यांवर LCB छापा! महिनाभरात चौथी मोठी कारवाई ५ आरोपींवर गुन्हे दाखल तर 33  लाखांचा मुद्देमाल जप्त  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपाद...

 अवैध कत्तलखान्यांवर LCB छापा! महिनाभरात चौथी मोठी कारवाई ५ आरोपींवर गुन्हे दाखल तर 33  लाखांचा मुद्देमाल जप्त 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-संगमनेर शहरात अवैध गोवंश कत्तलखान्यां विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB)  ने आक्रमक भूमिका घेतली असून,महिनाभरात चौथ्यांदा मोठी कारवाई करत गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या टोळीवर जोरदार छापा टाकण्यात आला आहे.या कारवाईत एकूण ५ आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून,33 लाख 31 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या कारवाईमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल व गोमांस विक्री रोखण्यासाठी श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक,अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस कठोर कारवाईचे आदेश दिले होते.त्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकात पोउपनि.महादेव गुट्टे,पोलीस अंमलदार गणेश लोंढे,विजय पवार,संतोष खैरे व बाळासाहेब गुंजाळ यांचा समावेश होता.दि.23 जानेवारी 2026 रोजी रात्री,संगमनेर शहर परिसरात कत्तलखान्याबाबत माहिती घेत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत जमजम कॉलनी, गल्ली नं.7,जुना जोर्वे रोड,संगमनेर येथील न्यू सेवा सॉ मिलसमोर असलेल्या वाड्यात गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी मुद्दसर अब्दुल करीम कुरेशी व त्याचे साथीदार महाराष्ट्र राज्यात गोवंश कत्तल करण्यास मनाई असतानाही जिवंत गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस वाहनात भरत असल्याचे समजले.

तत्काळ मदतीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग यांच्या कार्यालयातील पोलीस अंमलदार बापुसाहेब हांडे,राहुल सारबंदे व सुनील ढाकणे यांना पाचारण करण्यात आले.पथकाने घटनास्थळी जाऊन खात्री केली असता, काही इसम गोवंशीय जनावरांची कत्तल केलेले गोमांस वाहनात भरत असल्याचे दिसून आले. मात्र,पोलीसांची चाहूल लागताच आरोपींनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.

पळून गेलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

मुद्दसर अब्दुल करीम कुरेशी (फरार)

वाहीद अब्दुल करीम कुरेशी (फरार)

अक्रम अहमद कुरेशी (फरार) – सर्व रा. भारतनगर, संगमनेर, जि. अहिल्यानगर

शेहबाज गुलाम हुसेन शेख (फरार), रा. पुणे-नाशिक रोड, नाईकवाडा पुरा, संगमनेर

आदित्य राजेंद्र जाधव, रा. 526, जिल्हा परिषद शाळेजवळ, भोईदपाडा, गोखिवरे, वसई पूर्व, पालघर या छाप्यात पोलिसांनी 6,000 किलो गोमांस (किंमत ₹18,00,000), दोन पिकअप वाहने (₹12,00,000), 9 जिवंत गोवंशीय जनावरे (₹3,30,000), 2 सुरे (₹1,000) व 1 कुऱ्हाड असा एकूण ₹33,31,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 82/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, 325, 3(5) सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम 1995 (सुधारित 2015) चे कलम 5(ब), 5(क), 9, 9(अ) तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक अधिनियमाचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे करीत आहे.विशेष म्हणजे, स्थानिक गुन्हे शाखेने 25 डिसेंबर 2025 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध कत्तलखान्यांवर 4 गुन्हे दाखल करून 19 आरोपींविरुद्ध कारवाई केली असून, एकूण 63 लाख 75 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील काळातही अवैध कत्तलखाने समूळ नष्ट करण्याची मोहीम अधिक तीव्र केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

No comments