स्व.अनुष्का पाटोळे हिच्या मृत्यु प्रकाराची SIT,CBI,CID मार्फत चौकशी करावी .... जगदिश मानवतकर वाशिम प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...
स्व.अनुष्का पाटोळे हिच्या मृत्यु प्रकाराची SIT,CBI,CID मार्फत चौकशी करावी .... जगदिश मानवतकर
वाशिम प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
वाशिम :-दिनांक. ४ जानेवारी 2026 रोजी लातूर येथील नवोदय विद्यालय मध्ये इयत्ता सहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मातंग समाजाच्या हुशार व गुणवंत विद्यार्थिनीचा संशयस्पद मृत्यू झाला असून या प्रकरणामागे आत्महत्येचा बनाव करून हत्याचा गंभीर प्रकार दडपण्याचा प्रयत्न जवाहर नवोदय विद्यालय वस्तीगृह लातूर यांच्या मार्फत होत असल्याचा आरोप वाशीम येथील ऑल इंडिया ब्लू टायगर सेना चे अध्यक्ष जगदीश मानवतकर यांनी केला आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की ,लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालय वस्तीगृह मध्ये शिक्षण घेणाऱ्या स्व .अनुष्का पाटोळे यांच्या मृत्यू प्रकरणाची CID CBI,SIT मार्फत चौकशी करावी, सदर प्रकरणात दोषी शिक्षक, व शिक्षकेतर अधिकारी कर्मचारी व इतर कर्मचारी यांना अटक करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, सदरच्या प्रकरणात सरकारी वकील ॲड. उज्वल निकम साहेब यांची नेमणूक करावी, हे प्रकरण जलद न्यायालय मध्ये वर्ग करून आरोपींना तात्काळ न्यायालयीन कोठडी द्यावी, सदर प्रकरणात पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करताना दिसत असून अशा कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारचे निवेदन वाशिम जिल्हा शाखेच्या वतीने देण्यात आले आहे.
या प्रकरणात मुलगी मातंग समाजाची असून ती हुशार होती व तिच्या बुद्धिमत्तेमुळे तिच्या शिक्षकांना तिचा राग येत असे व या रागातून ते या मुलीला त्रास देत असत असा संशय या प्रकरणात येत आहे. सदरचे प्रकरण हे जातीयवादातून झाले आहे असा संशय येत आहे. मुलीच्या वडिलांनी ज्या शिक्षिकेवर आरोप केले आहेत त्या शिक्षिकेवर सुद्धा सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे व जवाहर नवोदय विद्यालय मधील दोषी कर्मचारी यांना कामातून बडतर्फ केले पाहिजे . मृत्यू झाल्यावर तिच्या आई-वडिलांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. मयत मुलगी ही दवाखान्यात ऍडमिट करून तिला शवविच्छेदन गृहामध्ये पाठविण्यात आले . मुलीला मृत्यूपूर्वी मारहाण करण्यात आली आहे असा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे . म्हणून या प्रकरणात मुख्यमंत्री यांनी लक्ष घालून सदर प्रकरणांमध्ये त्वरित न्याय द्यावा अन्यथा समस्त महाराष्ट्रातील मातंग समाज व ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेना महाराष्ट्र तर्फे सर्व जिल्ह्यात तीव्र आंदोलन केले जाईल अशा प्रकारचा इशारा यावेळी जगदीश मानवतकर यांनी दिला आहे. जा निवेदनाच्या वेळी ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेनाचे संस्थापक अध्यक्ष जगदीश मानवतकर, शहीद पोचीराम कांबळे क्रांतिफोर्सचे वाशिम जिल्हा अध्यक्ष संजय कुचेकर, उपाध्यक्ष सुधाकर पाटील, बहुजन मुक्ती पार्टीचे सौरभदादा गायकवाड, बिगर सातबारा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष राजू इंगोले एडवोकेट गुणवंत गायकवाड एडवोकेट जे. डी. बाजड, सौ.सुवर्णा सोनवणे, हर्ष मानमोठे, विजय पोळकर, वसंतराव वानखडे,सौ.मंगला खरात सौ.वंदना साबळे यांच्यासह वाशिम मधील सर्व मातंग समाजासह सर्व वाशिम मधील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

No comments