adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे. ई. स्कूल मुक्ताईनगर शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत घवघवीत यश

 जे. ई. स्कूल मुक्ताईनगर शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत घवघवीत यश  प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड)      मुक्ताईनगर...

 जे. ई. स्कूल मुक्ताईनगर शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत घवघवीत यश 

प्रा.सतिश गायकवाड मुक्ताईनगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

     मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शासकीय चित्रकला व रेखाकला ग्रेड परीक्षा (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) मध्ये नेत्रदीपक यश संपादन करून शाळेची उज्वल परंपरा कायम राखली आहे. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी एकूण 86 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये  अनिकेत अविनाश नाईक, अनुष्का भूषणकुमार राजपूत, गौरी नितीन पाटील, जयेश स्वप्निल खोले, मोक्षदा रविंद्र हरणे, सानिका योगेश पाटील, वैशाली समाधान माळी,वेदश्री अमोल चौधरी व वेदिका नितीन बोंडे या विद्यार्थ्यांनी ‘A’ ग्रेड मिळवून विशेष प्रावीण्य प्राप्त केले. तर 27 विद्यार्थी ‘B’ श्रेणीत व 46 विद्यार्थी ‘C’ श्रेणीत उत्तीर्ण झाले. एकूण निकाल 97.67 टक्के लागला.

इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेत दिप्ती सचिनसिंग ठाकोर , गायत्री नामदेव बावस्कर गायत्री राजेश चव्हाण, जान्हवी विकास पाटील, मीनल  जितेंद्र पाटील, पायल संजय सोनवणे, पायल श्रीराम सावरीपगार, प्राजक्ता सुधाकर सावळे, रसिका मनोज लुल्हे, रुपाली पांडुरंग नमाडे, साक्षी राजेश कासार, समर्थ शिवाजीराव वंजारी,समिक्षा महेंद्र उमाळे,  श्रिया अनिल चौधरी, श्रुती उमेश जावरे, स्वरा राजेश पाटील व तन्मय यशपाल जैन या 17 विद्यार्थ्यांनी ‘A’ श्रेणीत यश मिळवून विशेष प्रावीण्य प्राप्त केले. तर 34 विद्यार्थी ‘B’ श्रेणीत व 49 विद्यार्थी ‘C’ श्रेणीत उत्तीर्ण झाले.एकूण निकाल 94.33% लागला 

या यशस्वी विद्यार्थ्यांना कला शिक्षक श्री. मनोज सुरवाडे सर, हेमंतकुमार बाउस्कर सर व श्रीमती अर्चना भोळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे आधारस्तंभ मा. आ.श्री. एकनाथराव खडसे ,संस्थेच्या अध्यक्षा  मा. रोहिणीताई खडसे , सचिव डॉ. सी.एस.चौधरी,व सर्व संचालक मंडळ  प्राचार्य विकास चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments