adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कुटुंबापेक्षा पोलीस खात्यात कर्तव्याला प्रधान्य दिले, आज माझ्या सेवेला 23 वर्ष पूर्णता:- महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम !

 कुटुंबापेक्षा पोलीस खात्यात कर्तव्याला प्रधान्य दिले, आज माझ्या सेवेला 23 वर्ष पूर्णता:- महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम !   संभाजी पुरीगो...

 कुटुंबापेक्षा पोलीस खात्यात कर्तव्याला प्रधान्य दिले, आज माझ्या सेवेला 23 वर्ष पूर्णता:- महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम ! 


 संभाजी पुरीगोसावी. प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पुणे ग्रामीण विभागातील राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस हवालदार आदरणीय प्रमिला शरद निकम या पोलीस सेवेत रुजू झाल्यापासून आपल्या विविध कामगिरीने नेहमीच प्रयत्नशील दिसून येतात. त्यांच्या पोलीस खात्यातील सेवेला २३ वर्ष पूर्णता: होत आहेत. महिला पोलीस हवालदार निकम यांनी आपल्या प्रवासात कितीतरी दिवस-रात्र, ऊन-पाऊस, सण-उत्सव विसरून फक्त कर्तव्याला प्राधान्य दिलं. कधी कौतुक मिळालं, कधी टीका झाली, पण खाकीवरील विश्वास आणि जनतेची सुरक्षितता हेच ध्येय कायम ठेवलं. या २३ वर्षांत अनेक अनुभवांनी घडवलं, अनेक प्रसंगांनी शिकवलं आणि प्रत्येक दिवशी जबाबदारीची जाणीव करून दिली. कुटुंबापासून दूर राहूनही समाजासाठी उभं राहणं, हाच खरा अभिमान 

 या पोलीस खात्यामध्ये अविरत कामं करीत असताना शाळा, कॉलेज, गावामध्ये, तसेच काही सरकारी संस्थामध्ये जाऊन मोटिवेशनल स्पीच, पोक्सो कायदा, डायल 112,कायदेविषय मार्गदर्शन, निर्भया पथक, सायबर क्राईम, समुपदेशन, बालविवाह,अँटी रॅगिंग याबाबत माहिती देवुन त्यांना सतर्क व जागरूक रहाण्याबाबत माहिती दिली. वेगवेगळ्या पद्धतीने सोशल मीडियावर माहिती तसेच मुलाखती देवुन व काही लेख लिहून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. या सर्व करणामुळे अनेक प्रकारचे पुरस्कार देवुन मला सन्मानित करण्यात आले होते.   FICCI हा पुरस्कार दिल्ली येथे संपूर्ण भारत देशातील 22 IPS अधिकाऱ्यांचे मध्ये मी एकटीच महिला पोलीस हवालदार असताना मला मिळाला.महाराष्ट्रामधील  2 पोलीस अधीक्षक आणि मी असें तिघांची निवड झाली होती.

   जनमाणसात मान सन्मान हे सर्व काही या वर्दीनेच दिले,मला खुप अभिमान आहें या खाकीचा मी एक अंग आहें या खाकी वर्दीचा लाखो रुपयांचे कपडे विकत घेतले तरी त्याला या खाकी वर्दीची शोभा येत नाही. म्हणून ही खाकी वर्दी मी अभिमानाने घालून स्वाभिमानाने जगते. आज मागे वळून पाहताना समाधान आहे. कारण प्रत्येक दिवस प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि अभिमानाने जगलो. खाकी फक्त गणवेश नाही, ती एक ओळख आहे… एक जबाबदारी आहे… एक अभिमान आहे. माझ्या कुटुंबाचे, सहकाऱ्यांचे आणि जनतेचे मनापासून आभार  कर्तव्याला सलाम… खाकीला सलाम !  प्रमिला शरद निकम, पुणे ग्रामीण पोलीस राजगड पोलीस ठाणे.

No comments