adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

खाकी वर्दींतला देव माणूस गेला, साहेब यांना परत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे निधन!

 खाकी वर्दींतला देव माणूस गेला, साहेब यांना परत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे निधन!   सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (पुणे जिल्...

 खाकी वर्दींतला देव माणूस गेला, साहेब यांना परत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे निधन!  


सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 आमच्याकडूंन आपणांस कळवताना काळीज दाटून येत आहे. पुणे शहर पोलीस दलातील लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय सर्जेराव शामराव कुंभार (वय 50) यांचे शनिवारी मध्यरात्री हृदयविकारांच्या तीव्र धक्क्याने निधन झाले अत्यंत शांत,स्वयी आणि हसतमुख अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुंभार साहेब यांच्या जाण्यामुळे पोलीस दलासह सर्वसामान्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चांत आई पत्नी मुलगा मुलगी भाऊ भावजय असा परिवार आहे. मुलगा सिद्धेश आणि मुलगी सिद्धी सध्या शिक्षण घेत आहे सिद्धीही बी.ए.एम.एसचे शिक्षण घेत असून वडिलांच्या जाण्यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंभार साहेब हे आपली चोख ड्युटी करून शनिवारी 10 वाजता वडगांवशेरी येथील घरी परतले होते. मध्यरात्री 2च्या सुमारांस त्यांना अचानक हृदयविकारांचा तीव्र धक्का बसला त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र दुर्दैवांने उपचारांपूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली. कोल्हापूरमधील हातकणंगले तालुक्यांतील चावरे यामुळे गावी त्यांच्यावर शासकीय मानवंदना देवुन जड अंतकरणाने निरोप देण्यात येणार आहे. 12 ऑक्टोंबर 2024 रोजी त्यांनी लोणीकंद पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. नुकताच 25 ते 27 जानेवारी दरम्यान त्यांच्याकडे वाघोली पोलीस ठाण्याचा अतिरिक्त कार्यभार होता. आणि याच काळात दोन खुनाच्या घटना घडल्या होत्या पण दबावाखाली न येता कुंभार यांनी तातडीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्याच उत्कृंष्ट कामगिरीबद्दल 2025 मध्ये त्यांना सुरक्षित पुणे हा पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार हे महाराष्ट्र पोलीस खात्यात उत्कृंष्ट सेवा करीत होते. पण काळापुढे आणि नियतीपुढे कोणाचेच काही चालत नाही, आदरणीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार साहेबांनी आपल्या कुटुंबाचा, पोलीस खात्यातील मित्र परिवारांचा सर्वसामान्यांचा लवकरच निरोप घेतला.

No comments