adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

गोपाळपूरांत हळदी कुंकूच्या कार्यक्रमांत चोरीस गेलेले आठ लाख 25 हजार रुपयांचे दागिने हस्तगत, पंढरपूर तालुका पोलिसांची दमदार कामगिरी!

  गोपाळपूरांत हळदी कुंकूच्या कार्यक्रमांत चोरीस गेलेले आठ लाख 25 हजार रुपयांचे दागिने हस्तगत, पंढरपूर तालुका पोलिसांची दमदार कामगिरी!  सौ. श...

 गोपाळपूरांत हळदी कुंकूच्या कार्यक्रमांत चोरीस गेलेले आठ लाख 25 हजार रुपयांचे दागिने हस्तगत, पंढरपूर तालुका पोलिसांची दमदार कामगिरी! 


सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी.

 पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हळदी कुंकूच्या कार्यक्रमांत चोरीस आठ लाख 25 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करीत पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई आहे. 

पंढरपूर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 126 ऑब्लिक 26 डी एन एस कलम 304 या गुन्ह्यात फिर्यादी आबासाहेब आसबे रा. गोपाळपूर यांनी दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार यांच्या पत्नीचे दागिने हळदी कुंकूच्या कार्यक्रमांसाठी जात असताना सुमारे आठ लाख 25 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे वरील कलमाप्रमाणे cr number 126/26 BNS कलम 304 प्रमाणे गुन्हा दाखल होता.


सदर गुन्ह्याचे तपासामध्ये  फिर्यादी  यांच्याकडे सखोल तपास करून त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे फिर्यादी कडूंन घटनेची संपूर्ण माहिती घेवुन पंढरपूर तालुका पोलिसांनी घटनेच्या दिवशी हळदी कुंकू च्या कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांकडे विचारपूस करून त्यातून सखोल तपास करून मंगळवेढा येथील व्यवसायिक अविनाश वाघमारे रा. मंगळवेढा याला ताब्यात घेवुन सखोल विचारपूस केली असता सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिल्यानंतर अविनाश वाघमारे (रा. मंगळवेढा व गोपाळपूर) येथील त्याचा मित्र यांच्याकडून चोरीस गेलेले सर्व दागिने एकूण आठ लाख 25 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने एकूण वजन 55 ग्राम सोन्याचे दागिने काढून दिले ते पंचायत समक्ष जप्त करण्यात आले आहे 

सदर गुन्ह्यातील एकूण 82,5000 रुपयांचे सोन्याचे दागिने पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या सोन्याची शंभर टक्के रिकव्हरी केली आहे. 

सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती विभावरी रेळेकर मॅडम पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले asi विजू गायकवाड पोलीस हवालदार सचिन आटपाडकर पोलीस हवालदार साळुंखे बाजीराव काकडे सागर गवळी मंगेश रोकडे विजयकुमार आवटी अभिमन्यू गरड चालक पोलीस हवालदार हासन नदाफ विलास घाडगे यांच्या पथकांने केली आहे. पंढरपूर तालुका पोलिसांच्या या कामगिरीबद्दल  पोलीस अधीक्षक  अधीक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे.

No comments