मधु ताराने केला नवनिर्वाचित वर्धा नगराध्यक्षांचा सन्मान वर्धा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा ...
मधु ताराने केला नवनिर्वाचित वर्धा नगराध्यक्षांचा सन्मान
वर्धा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा वर्धा येथील मधु तारा सोबती गोरगरिबांसाठी नेहमी धावून जाणारे समाज कार्यात आपला ठसा उमटवणारे नवनिर्वाचित वर्धा नगर परिषदेचे नगराध्यक्ष मा.सुधीरभाऊ पांगुळ यांचा सन्मान मधु तारा प्रमुख विश्वस्त अश्विनीताई गिरडकर.वर्धा जिल्हा प्रमुख वैशालीताई गिरडकर.मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी शाल फुलांचा गुच्छा देऊन सन्मान केला व त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या वेळी मधु ताराचे कार्य राज्यभर आणि वर्ध्यात गेल्या तीन वर्षांपासून आपण पाहत आलोय आणि या कार्यातूनच श्री नितीनजी शिंदे यांच्या सोबत मैत्रीचे ऋणानुबंध निर्माण झाले आहेत.मधु तारा संस्थेसाठी येणाऱ्या दिवसात आपल्या नगर परिषदेच्या माध्यमातून शक्य ते सहकार्य नक्कीच केले जाईल अशी भावना नगराध्यक्ष पांगुळ साहेबांनी व्यक्त केली.
या प्रसंगी मधु तारा प्रमुखांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.

No comments