adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बालकनाथजी महाराज यांना ‘समाजभूषण पुरस्कार – २०२६’ जाहीर...

 बालकनाथजी महाराज यांना ‘समाजभूषण पुरस्कार – २०२६’ जाहीर...  विकास पाटील धरणगाव  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) एरंडोल -- तालुक्यातील फरकांडे ...

 बालकनाथजी महाराज यांना ‘समाजभूषण पुरस्कार – २०२६’ जाहीर... 


विकास पाटील धरणगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

एरंडोल -- तालुक्यातील फरकांडे येथील ‘वैचारिक स्वराज्य’ या आध्यात्मिक - सामाजिक संस्थेच्या वतीने हजारो तरुणांना व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवणारे प.पू. गुरुवर्य श्री बालकनाथजी महाराज यांना ‘समाजभूषण पुरस्कार – २०२६’ जाहीर झाला आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी की, आजच्या दिशाहीन - व्यसनाधीन होत चाललेल्या तरुण पिढीला अध्यात्म, भक्ती व सदाचाराच्या मार्गावर आणण्याचे महान कार्य करणारे, नवनाथ भक्तीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा दीप प्रज्वलित करणारे श्री नवनाथ मंदिर संस्थान कोळ पिंप्री संस्थांनचे अध्यक्ष, ॲडव्होकेट दिनेश जिजाबराव काटे म्हणजेच आपल्या सर्वांचे परमपूज्य गुरुवर्य श्री बालकनाथजी महाराज यांना ‘वैचारिक स्वराज्य’ या आध्यात्मिक-सामाजिक संस्थेच्या वतीने ‘समाजभूषण पुरस्कार – २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. हा गौरव सोहळा दि. ९ फेब्रुवारी २०२६ वार सोमवार रोजी सायंकाळी ४:०० वा. हरिनाम सप्ताह, फरकांडे ता. एरंडोल येथे भक्तीमय वातावरणात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज व देहू संस्थानचे विश्वस्त अध्यक्ष ह.भ.प. माणिक महाराज मोरे यांच्या शुभहस्ते, तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प.पू. गुरुवर्य बालकनाथजी महाराज यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

            प.पू. बालकनाथजी महाराज यांनी आपल्या प्रभावी प्रवचनशैलीतून, नवनाथ भक्ती, हरिनाम, संस्कार शिबिरे, व्यसनमुक्ती जनजागृती, तसेच सामाजिक सेवाकार्यातून हजारो तरुणांचे आयुष्य सकारात्मक दिशेने वळवले आहे. व्यसनांच्या गर्तेत अडकलेल्या युवकांना अध्यात्मिक मूल्यांची ओळख करून देत, भक्ती, सेवा व सदाचाराच्या मार्गावर जोडण्याचे मोलाचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. समाजप्रबोधन, अध्यात्म व सेवाभाव यांचा त्रिवेणी संगम असलेला हा पुरस्कार सोहळा अनुभवण्यासाठी सर्व भाविक, सामाजिक कार्यकर्ते व तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वैचारिक स्वराज्य (आध्यात्मिक • सामाजिक • सांस्कृतिक चळवळ) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments