व्यापारी संकुलातील गाळ्यांना भीषण आग लागून पाच दुकाने भस्मसात लाखोंचे नुकसान मुबारक तडवी सह संपादक (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर त...
व्यापारी संकुलातील गाळ्यांना भीषण आग लागून पाच दुकाने भस्मसात लाखोंचे नुकसान
मुबारक तडवी सह संपादक
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील सावदा येथील अंकलेश्वर बुर्हानपूर महामार्गावरील सावदा-फैजपूर रोडवरील विश्वसुधा हॉस्पिटल ला लागून असलेल्या असलेल्या विश्वसुधा शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागून पाच दुकाने पूर्णपणे भस्मसात होऊन दुकानातील साहित्य वस्तूंची अक्षरक्षा राखरांगोळी झाली या घटनेत सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ४ वाजेच्या सुमारास घडली. दोन मुस्लिम युवक नमाज अदा करून रस्त्यावरून जात असताना दुकानातून आग भडकलेली पाहून त्यांनी तात्काळ कॉम्प्लेक्सचे संचालक डॉ. वसंत बंगाळे यांना सूचना दिली. त्यानंतर डॉ. बंगाळे यांना फोनद्वारे माहिती देण्यात आली आणि बचावकार्य सुरू झाले. या आगीत ललित वाघोदे, शुभम पाटील, राहुल रमेश निंभोरे, शुभम चौधरी आणि दिलीप नामदेव धांडे यांच्या मालकीच्या पाच दुकानांचे मोठे नुकसान झाले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विद्युत शॉर्टसर्किट किंवा अन्य कारण याचा तपास सुरू आहे.
माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी तात्काळ स्थानिक अग्निशमन दलाला सूचना देऊन घटनास्थळी फायर ब्रिगेडची गाडी पाठवली. सावदा पोलीस सपोनि विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल सानप आणि अमोल गर्जे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणण्यासाठी बचाव कार्यासाठी प्रयत्न केले. सावदा पोलीस स्टेशन ला घटनेचा पंचनामा करण्यात येत असून, अधिक तपास सुरू आहे. घटनास्थळी सावदा शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रेणुका राजेंद्र पाटील, नवनिर्वाचित नगरसेवक, स्थानिक समाजसेवक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी या घटनेमुळे मोठी आर्थिक हानी झाल्याची खंत व्यक्त केली आहे. प्रशासनाने आग लागण्याचे कारण शोधण्यासाठी तातडीने तपास सुरू केला असून, लवकरच याबाबत अधिक माहिती समोर येईल, अशी अपेक्षा आहे.

No comments