निलेश सोनवणे यांना 'तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले गुणवंत शिक्षक' पुरस्कार समाज प्रबोधनाच्या वाटेवरचा शिक्षक सन्मानित मुबारक तड...
निलेश सोनवणे यांना 'तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले गुणवंत शिक्षक' पुरस्कार
समाज प्रबोधनाच्या वाटेवरचा शिक्षक सन्मानित
मुबारक तडवी सह संपादक
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद यांच्या वतीने दिला जाणारा तात्यासाहेब महात्मा जोतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार श्री. निलेश साहेबराव सोनवणे यांना जाहीर करण्यात आला आहे. शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन मानून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण, गुणवत्तापूर्ण व समाजाभिमुख कार्याची दखल तसेच ते अनेक वर्षापासून शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेचा प्रसार करीत आहे.भारतीय संविधानामधील समता, स्वातंत्र,बंधुता, व न्याय या मूल्यांचे आचरण करून त्यांचे विविध घटकांपर्यंत प्रसार करीत आहे. त्यांचे शैक्षणिक,सामाजिक व समाज प्रबोधन या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.श्री.निलेश साहेबराव सोनवणे हे माध्यमिक विद्यालय धारशेरी, ता.धरणगांव, जिल्हा. जळगांव येथे कार्यरत असून त्यांनी अध्यापनाबरोबरच नवोपक्रमशील शिक्षणपद्धती, मूल्यशिक्षण, वाचनसंवर्धन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, तसेच आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी विशेष शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक यशासोबतच जीवनमूल्यांची जाणीव विकसित केली आहे.
महात्मा जोतिराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेतून प्रेरणा घेऊन समता, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांची जपणूक करत त्यांनी शाळा–समाज यांचा दुवा अधिक मजबूत केला आहे. शिक्षक म्हणून कर्तव्य बजावत असतानाच समाज प्रबोधनाचे कार्य त्यांनी अखंडपणे सुरू ठेवले आहे.
हा पुरस्कार अल्प बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे झालेल्या भव्य समारंभात शिक्षक आमदार नाशिक विभागचे मा.भाऊसो किशोरजी दराडे,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्री.उत्तमजी कांबळे,श्री. किरण सोनवणे ज्येष्ठ पत्रकार, श्री.भरतजी शिरसाठ सर, श्री.रणजित सोनवणे सर , श्री.डी.के.अहिरे सर,श्री.भैय्यासाहेब सोनवणे सर, श्री.अजय भामरे सर शिक्षण व इतर सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर,शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पुरस्कारामुळे निलेश सोनवणे यांचे कार्य राज्यस्तरावर गौरविले गेले असून शाळा व्यवस्थापन, सहकारी शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे. हा सन्मान भविष्यातील शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी प्रेरणादायी ठरेल, तसेच माझे गुरुवर्य बापुसो. श्री.आर.डी.पाटील साहेब यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन भविष्यातही शैक्षणिक ,सामाजिक व समाज प्रबोधनाचे कार्य अखंडपणे चालू राहील अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

No comments