युवा केंद्र राष्ट्रीय स्तरावरील महाराष्ट्रातील नवयुवकांच्या गटातून चिन्मय वाघुळदे यांची निवड इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गाय...
युवा केंद्र राष्ट्रीय स्तरावरील महाराष्ट्रातील नवयुवकांच्या गटातून चिन्मय वाघुळदे यांची निवड
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या 'मेरा भारत युवा केंद्र' या राष्ट्रीयस्तरावरील प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या आंतरराज्य युवा विनिमय कार्यक्रम 2026 साठी महाराष्ट्रातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे चिन्मय मिलिंद वाघुळदे यांची निवड करण्यात आली आहे विशेष म्हणजे त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील आणखी आठ युवकांचीदेखील निवड झाली असून, या ९ युवकांचा गट या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. निवड झालेला हा युवकांचा गट २२ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत केरळ राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहे हा दौरा कमलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे. या कार्यक्रमातून विविध राज्यांतील युवकांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण, राष्ट्रीय एकात्मता, नेतृत्व कौशल्य आणि सामाजिक जाणीव वाढविण्याचा उद्देश आहे. चिन्मय वाघुळदे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांच्या या निवडीबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा युवा अधिकारी अभिषेक चावरे, आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल जावळे यांनी त्यांचे कौतुक केले आहे. या निवडीमुळे जळगाव जिल्ह्याचा लौकिक राष्ट्रीय पातळीवर उंचावला आहे जिल्ह्यातील युवकांनी सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्र उभारणीच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असा सकारात्मक संदेश या निवडीमुळे मिळत आहे.केरळ दौऱ्यासाठी जळगावातील ९ युवक जाणार; मान्यवरांकडून कौतुक केले असून चिन्मय वाघुळदे हे फैजपुर नगरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघुळदे यांचे सुपुत्र आहेत

No comments