खिर्डी बु! येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभार विरोधात.. ग्रामस्थांची गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार.. मुबारक तडवी रावेर (संप...
खिर्डी बु! येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभार विरोधात..
ग्रामस्थांची गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार..
मुबारक तडवी रावेर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील खिर्डी बु! येथील ग्रा.पं चे ग्रामविकास अधिकारी व प्रभारी सरपंच यांची शासकीय कामात होत असलेली ढवळाढवळ तसेच काही ग्रा.पं सदस्य यांना विश्वासात न घेता तसेच घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे बौद्ध समाज बांधवांनी लेखी तक्रार करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे की खिर्डी बु! येथील वॉर्ड क्र 1 बौद्ध वस्तीत होऊ घातलेले तथा मंजूर करण्यात आलेले पेव्हर ब्लॉक चे काम हे त्या ठिकाणी न करता दुसऱ्या वॉर्ड मध्ये करण्याचा घाट ग्रा.पं.ग्रामविकास अधिकारी व प्रभारी सरपंच , सदस्य हे परस्पर जागा ठरवून तसेच दलीत वस्ती मधून निवडून आलेले सदस्य तथा रहिवासी यांना सुद्धा विश्वासात न घेता परस्पर कारभार करत असल्याचे निर्देशनात येत आहे.
ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी, प्रभारी सरपंच, सदस्य हे जाणीवपूर्वक व सूडबुद्धीने चुकीचे निर्णय घेत आहेत. असे स्थानिक रहिवासी यांच्याकडून वॉर्ड सोडून दुसरी कडे करत असलेल्या पेव्हर ब्लॉक च्या कामाला स्थगिती देण्या बाबत सूचना मांडण्यात आली. तरी संबंधित अधिकारी यांनी लक्ष घालून ग्रामविकास अधिकारी, तथा प्रभारी सरपंच, सदस्य यांच्या मनमानी कारभार तसेच जनहिताचे निर्णय न घेता हेतु पुरस्कर चुकीचे निर्णय घेऊन सामाजिक तेढ निर्माण होईल असे निर्णय घेतात. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायत अधिकारी, प्रभारी सरपंच, सदस्य यांनी कामा संदर्भात घेण्यात आलेल्या चुकीच्या निर्णयाची चौकशी करण्याची मागणी माजी सरपंच तथा बौद्ध महिला समाजबांधव यांनी गटविकास अधिकारी यांना केली.


No comments