स.पो.नि. आशिष कांबळे यांनी वेळापूर पोलीस ठाणेचा पदभार स्वीकारला, तर स.पो.नि. भाऊसाहेब गोसावी यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली! सौ. शुभांगी...
स.पो.नि. आशिष कांबळे यांनी वेळापूर पोलीस ठाणेचा पदभार स्वीकारला, तर स.पो.नि. भाऊसाहेब गोसावी यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली!
सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील आज रोजी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरून पाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये स.पो.नि.बसवेश्वर जकिकोरे (नियंत्रण कक्ष ते कामती पोलीस ठाणे,) स.पो.नि. आशिष कांबळे (पंढरपूर शहर पोलीस ठाणे ते वेळापूर पोलीस ठाणे) स.पो.नि. (विशाल वायकर स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण ते नातेपुते पोलीस ठाणे) स.पो.नि. भाऊसाहेब गोसावी वेळापूर (वेळापूर पोलीस ठाणे ते स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण) स.पो.नि. रोहित शिंदे (करमाळा पोलीस ठाणे ते माढा पोलीस ठाणे) वरील पाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये वेळापूर पोलीस ठाण्यात स.पो.नि. आशिष कांबळे यांनी पहिल्याच दिवशी स.पो.नि. भाऊसाहेब गोसावी यांच्याकडून वेळापूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. स.पो.नि. आशिष कांबळे हे एक पोलीस खात्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी सातारा जिल्हा पोलीस दलातही वाई भुईंज पुसेगांव अशा पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सातारा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्णता: झाल्यामुळे त्यानंतर त्यांची बदली सोलापूर ग्रामीण ला झाली होती. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. तर वेळापूरचे स.पो.नि. भाऊसाहेब गोसावी यांनीही वेळापूर पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, त्यांची बदली सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेत झाली आहे. स.पो.नि. गोसावी त्यांच्या बदलीनंतरही वेळापूर पोलीस ठाण्याला खमक्या अधिकारी मिळाल्याचे जनतेंतून बोलले जात आहे.

No comments