adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथील मौलाना हाफिज हुझैफाअली यांनी अल्पवयात केले पवित्र कुरान पठाण माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान यांचे कडून गौरव

 फैजपूर येथील मौलाना हाफिज हुझैफाअली यांनी अल्पवयात केले पवित्र कुरान पठाण  माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान यांचे कडून गौरव  इदू पिंजारी फैजपू...

 फैजपूर येथील मौलाना हाफिज हुझैफाअली यांनी अल्पवयात केले पवित्र कुरान पठाण

 माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान यांचे कडून गौरव 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आज फैजपूर शहरातील ताहा नगर परिसरात राहणारे मासूम अली यांचे सुपुत्र मौलाना हुझैफा अली यांनी पवित्र कुरआन शरीफ हिफ्ज पूर्ण करून “हाफिज” ही मानाची पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या मोठ्या यशामुळे संपूर्ण फैजपूर शहराची शान वाढली आहे. या गौरवशाली प्रसंगी त्यांचा सत्कार कारी बदीउज्जमा साहेब, शेख कुरबान तसेच कुरबान मेंबर मित्र परिवार यांच्या हस्ते करण्यात आला. मौलाना हुझैफा अली यांनी अल्पवयात कुरआन शरीफ हिफ्ज करून समाजासाठी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे हे यश केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण मुस्लिम समाजासाठी अभिमानाची बाब आहे. अल्लाह तआला त्यांना पुढील आयुष्यात अधिकाधिक दीनची खिदमत करण्याची तौफीक देवो आणि त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य प्रदान करो, हीच दुआ. त्यांच्या या उज्ज्वल कामगिरीबद्दल हार्दिक  व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

No comments