adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपड्यात २६ पासून मसाप प्रियजन स्मृती व्याख्यानमाला

 चोपड्यात २६ पासून मसाप प्रियजन स्मृती व्याख्यानमाला   चोपडा प्रतिनिधी (संपादक हेमकांत गायकवाड) चोपडा - महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा ...

 चोपड्यात २६ पासून मसाप प्रियजन स्मृती व्याख्यानमाला  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक हेमकांत गायकवाड)

चोपडा - महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चोपडा शाखेतर्फे दर वर्षाप्रमाणे तीन दिवसीय प्रियजन स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. येथील पंकज नगर परिसरातील पंकज बाल संस्कार केंद्राच्या आवारात दररोज रात्री ८.३० वाजता या व्याख्यानमालेत विविध विषयांवर महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते आपले विचार मांडणार आहेत.

        २६ रोजी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प पुणे येथील माधवबाग कार्यक्रम योजनेचे समन्वयक डॉ. मिलिंद सरदार हे 'आनंदी आणि सुदृढ जीवनाची गुरुकिल्ली' या विषयावर गुंफणार आहेत. तर २७ रोजी मराठी राजभाषा दिनानिमित्त 'माझ्या मराठीची बोलु कौतुके..' या विषयावर जळगाव येथील प्रसिद्ध व्याख्याते रामचंद्र पाटील दुसरे पुष्प गुंफणार आहेत. व्याख्यानमालेचा समारोप २८ रोजी नागपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक प्रा. ज्ञानेश वाकुडकर हे 'जिंकण्याला कुठे तारखा पाहिजे?' या विषयावरील व्याख्यानाने करणार आहेत. या व्याख्यानमालेचे प्रायोजक हरताळकर हॉस्पिटलचे डॉ. विकास हरताळकर, जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल, पंकज समूहाचे डॉ. सुरेश बोरोले यांच्यासह रोटरी क्लब ऑफ चोपडा, सौ. कुसुम पाटील, भूपेंद्र पाटील, चंदुलाल पालीवाल, शशिकांत पाटील, डॉ. तृप्ती व डॉ. राहुल पाटील, ॲड. डी. पी. पाटील यांनी आपल्या प्रियजनांच्या स्मृती प्रित्यर्थ स्वीकारले आहे.

       चोपडेकर रसिकांची सांस्कृतिक श्रीमंती वाढवणाऱ्या या तीन दिवसीय व्याख्यानमालेस चोपडेकर रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन मसाप चोपडा शाखेचे अध्यक्ष कवी अशोक सोनवणे, उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र महाजन, कार्याध्यक्ष विलास पं. पाटील, प्रमुख कार्यवाह संजय बारी, कार्यवाह गौरव महाले, कोषाध्यक्ष योगेश चौधरी यांनी केले आहे.

No comments