adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नशिराबाद येथे शिवजयंती उत्साहात साजरी..

 नशिराबाद येथे शिवजयंती उत्साहात साजरी..  विकास पाटील धरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव -- तालुक्यातील नशिराबाद येथे तीन दिवशीय शिवज...

 नशिराबाद येथे शिवजयंती उत्साहात साजरी.. 


विकास पाटील धरणगाव

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव -- तालुक्यातील नशिराबाद येथे तीन दिवशीय शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त शिवरायांचे आरमार तसेच अस्सल चित्रे यांचे प्रदर्शन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि वैचारिक प्रबोधन यांसारखे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवजयंती उत्साहात साजरी झाली.

               याबाबत सविस्तर माहिती अशी की, अखिल भारतीय सकल मराठा समाज मंडळ व शिवसह्याद्री प्रतिष्ठान व मित्रपरिवार नशिराबाद आयोजित हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्तानचे आराध्यदैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने धरणगाव येथील संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांचे व्याख्यान दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी सायं. 7 ते 10 दरम्यान श्री मंगलमूर्ती मंगल कार्यालय नशिराबाद येथे उत्साहात संपन्न झाले. याच ठिकाणी दि. 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान शिवरायांचे भव्य आरमार व जहाज व्यवस्था याचे प्रदर्शन महेश पवार (जळगाव) व शिवरायांचा पोशाख आणि जगभरातील अस्सल छायाचित्रे यांच्या प्रदर्शनासाठी संकेत गांगुर्डे (धरणगाव) यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. प्रमोद आमोदकर यांनी मागील दहा वर्षांपासून सुरु असलेल्या शिवजयंती उत्सवाची माहिती दिली. न्यू इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थ्यांनी शंभूराजे यांचा जन्मोत्सव व कार्यावरील नाटिका व विलोभनीय नृत्य अतिशय उत्कृष्टरित्या सादर केली, या विद्यार्थ्यांना प्रवीण महाजन यांचे सहकार्य लाभले. तसेच चिमूरडी कुमारी तनिष्का चव्हाण हिने देखील उत्तम नृत्य सादरीकरण करत सर्वांची मने जिंकून घेतली. गोदावरी वैद्यकीय कॉलेज येथील डॉ. आदित्य पाटील यांनी शिवराय यांच्या जीवनावर सादर केलेल्या कवितेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी शिवरायांच्या जीवनातील विविध बाबींवर प्रकाश टाकला. शेतकऱ्यांचे कैवारी, पर्यावरणाचे रक्षक, जलव्यवस्थापन करणारे, आई - वडिलांची आज्ञा मानणारे, रयतेची काळजी घेणारे, आरामाराचे जनक असलेले शिवराय निश्चितच काळाच्या पलीकडे विचार करणारे राजे होते असे प्रतिपादन व्याख्याते पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अतिशय बहारदार शैलीत सूत्रसंचालन बी आर खंडारे यांनी केले. 

              कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नशिराबाद नगरीचे नगराध्यक्ष योगेश पाटील, उपनगराध्यक्ष पंकज महाजन, धरणगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष लीलाताई सुरेश चौधरी यांच्या हस्ते महाराजांचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी नशिराबादचे नगरसेवक लालचंद पाटील, कीर्तीकांत चौबे, विकास पाटील, मनोज पाटील, विकास धनगर, पराग नारखेडे, बापू बोढरे, चेतन बऱ्हाटे, सचिन हिंगणे, प्रदीप देशपांडे, किशोर पाटील, भूपेश कुलकर्णी, जनार्दन माळी, आनंदराव मराठे, भानुदास मराठे, अवधूत मराठे, मुकुंदा रोटे, प्रकाश माळी, बाळू  सोनवणे (नांद्रा ग्रुप) आदी मान्यवर उपस्थित होते. यांच्यासमवेत पत्रकार चंदन पाटील, विश्वनाथ महाजन, डॉ. दिपक लोखंडे, हरीष पाटील, सुनिल महाजन, सागर मोरे हे देखील उपस्थित होते.

                  कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आदरणीय गणेशभाऊ चव्हाण आणि सोनालीताई चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष गोपाल पाटील, उपाध्यक्ष देविदास काकडे तसेच सदस्य किशन साळुंखे, महेंद्र मराठे, अनिल काळे, संजय पाटील, अरुण मराठे, अशोक मराठे, शांताराम मराठे, सुभाष मराठे, सुरेश मराठे, बापू शिंदे, नथ्यू चव्हाण, राहुल मराठे, भरत मराठे, दिपक चव्हाण, जयेश पाटील, लोमेश पाटील, गणेश मराठे, भूषण मराठे, रमेश मराठे, गोकुळ मराठे, ललित मराठे, कुदंन मराठे, पवन मराठे, किशोर चव्हाण, प्रवीण मिस्तरी, युवराज मराठे, शुभम जाधव, किरण नांद्रे, रोहन माळी अभिषेक माळी आदींनी परिश्रम घेतले. शिवजन्मोत्सव कार्यक्रमाला नशिराबाद नगरीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली म्हणून हा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.

No comments