फैजपूरात बंद असलेल सीसीटी व्ही कॅमेरे दोन दिवसात सुरू होणार इदू पिंजारी फैजपुर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) फैजपूर पूर्ण शहरात डोळ्याच...
फैजपूरात बंद असलेल सीसीटी व्ही कॅमेरे दोन दिवसात सुरू होणार
इदू पिंजारी फैजपुर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
फैजपूर पूर्ण शहरात डोळ्याच्या' कडक निगराणी असलेल्या
शहरात गेल्या काही वर्षापासून पासून भागांतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांच्या सुरक्षेचा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या रक्षणाचा विषय अत्यंत गंभीर असल्याने, याची तातडीने दखल घेण्यात आली आहे.
नगराध्यक्षा सौ. दामिनी पवन सराफ आणि सर्व सन्माननीय नगरसेवकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आणि निगराणीखाली संपूर्ण शहरात सीसीटीव्ही यंत्रणेची सखोल तपासणी करण्यात आली.
जुने व नादुरुस्त कॅमेरे हटवले: जे कॅमेरे तांत्रिक कारणांमुळे बंद होते, ते शोधून काढण्यात आले.अद्ययावत तंत्रज्ञान ( खराब झालेल्या कॅमेऱ्यांच्या जागी आता हाय-डेफिनिशन आणि नवीन तंत्रज्ञानाचे कॅमेरे बसवण्यात आले आहेत, जेणेकरून गुन्हेगारीला आळा बसेल.पर्णत्वाकडे काम: शहरातील बहुतांश भागांतील कॅमेरे आता कार्यान्वित होणार असून, केवळ काही मोजक्या ठिकाणचे काम शिल्लक आहे. ते देखील उद्यापर्यंत युद्धपातळीवर पूर्ण केले जाईल.
प्रशासनाच्या या तत्परतेमुळे आता संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येणार असून, गुन्हेगारांवर वचक बसेल आणि नागरिक अधिक सुरक्षित अनुभवतील.
जनतेच्या तक्रारींची दखल घेऊन कामात पारदर्शकता आणि वेग राखण्यासाठी आम्ही पालिका प्रशासकाने ठोस पाऊस उचललेले आहे त्यामुळे नागरिकांना अधिक दिलासा मिळणार आहे तसेच दोन मार्च पासून खंडोबा देवस्थानची पारंपारिक सलग आठ दिवस यात्रेला प्रारंभ होणार असून या कॅमेरे मुळे पोलिसांना सुद्धा मदत मिळणार आहे

No comments