adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वारंवार तक्रारी नंतरही कारवाई शून्य: वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

 वारंवार तक्रारी नंतरही कारवाई शून्य: वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह  भुसावळ तालुका प्रतिनिधी :  संपादक हेमकांत गायकवाड  भुसावळ टोल नाका...

 वारंवार तक्रारी नंतरही कारवाई शून्य: वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह 


भुसावळ तालुका प्रतिनिधी : 

संपादक हेमकांत गायकवाड 

भुसावळ टोल नाका ते फैजपूर कारखाना दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेकायदेशीर वृक्षतोडीची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या संदर्भात भीम आर्मी भारत एकता मिशन चे जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल मंगलाबाई लक्ष्मण जयकर यांनी वन विभागाकडे वारंवार तक्रारी व स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी 06 जानेवारी 2026, 06 फेब्रुवारी 2026 व 23 फेब्रुवारी 2026 रोजी दिलेल्या स्मरणपत्रांमध्ये वृक्षतोडीची सखोल चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल थांबवण्याची मागणी केली आहे.

अर्जदारांनी वन परिक्षेत्र अधिकारी (यावल पूर्व) स्वप्निल फटांगरे यांच्याकडे तक्रार दिली असली तरी अद्याप कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या मते, मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे पर्यावरणीय हानी होत असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

दरम्यान, बेकायदेशीर वृक्षतोड सिद्ध झाल्यास संबंधित ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय, यावल समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा ठाम इशारा देण्यात आला आहे. न्याय न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.  तक्रारी संदर्भात स्मरणपत्र देताना युनुस तडवी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

No comments