adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पदभार घेताच, नशिराबाद पोलिसांकडून धडाका! गोमांस,वाळू दारू जुगार अवैध धंद्यांवर कारवाई :- सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे!

 पदभार घेताच, नशिराबाद पोलिसांकडून धडाका! गोमांस,वाळू दारू जुगार अवैध धंद्यांवर कारवाई :- सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे!   सौ. शुभां...

 पदभार घेताच, नशिराबाद पोलिसांकडून धडाका! गोमांस,वाळू दारू जुगार अवैध धंद्यांवर कारवाई :- सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे!  


सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (जळगाव जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगांव जिल्हा पोलीस दलातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना ओळखले जाते. त्यांनी जिल्ह्यामध्ये कासोदा पोलीस ठाणे, तर पोलीस मुख्यालयात विविध पदावर काम पाहिले आहे. नुकताच म्हणजेच 27 डिसेंबर 2025 रोजी नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी पदभार घेताच नशिराबादकरांना कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असे त्यांनी आवाहन केले होते. मात्र जळगांव शहरांच्या प्रवेशद्वारांवर असलेल्या या पोलीस ठाणेच्या हद्दीत गुन्हेगारीला मात्र आळा घालण्यासाठी योगिता नारखेडे यांनी चांगलाच आक्रम पवित्रा घेतला आहे. पदभार घेतल्यापासून राबवलेल्या विशेष मोहिमेत नशिराबाद पोलिसांचा चालणाऱ्या अवैधरित्या धंद्यावर चांगलाच कारवाईचा धडाका दिसून येत आहे. यामध्ये एका सराईत गुन्हेगार टोळीला जिल्ह्यातून हद्दपार केले असून. खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींच्या देखील मुसक्या आवळल्या आहेत. तर वाळूमाफिया आणि गोमांस वाळू दारू जुगार अशा अवैध धंद्यावर केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे देखील आता धाबे दणाणले आहेत. नशिराबाद पोलीस स्टेशनच्या या सर्व कारवायांमुळे परिसरांत कायद्याचा धाक निर्माण झाला असून गुन्हेगारांमध्ये दहशत पसरली आहे. ही संपूर्ण कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे मॅडम व त्यांच्या पथकांने प्रभावीपणे पार पाडली आहे. त्यामुळे परिसरांतील जनतेतून नशिराबाद पोलिसांचेही कौतुक होत आहे.

No comments