adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ए आयच्या युगातही हस्तकलेचा सन्मान; छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चोपड्यात अनोखे मिनिएचर चित्र साकार

 ए आयच्या युगातही हस्तकलेचा सन्मान; छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चोपड्यात अनोखे मिनिएचर चित्र साकार  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमका...

 ए आयच्या युगातही हस्तकलेचा सन्मान; छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त चोपड्यात अनोखे मिनिएचर चित्र साकार 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

१९ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त, आजच्या एआयच्या आधुनिक युगातही हस्तकला जिवंत असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. कला ही केवळ सृजन नसून ती कलाकाराच्या जगण्याचा श्वास असते, हे सिद्ध करणारे अनोखे चित्र साकारण्यात आले आहे. अनिलराज पुनमचंद पाटिल (चोपडा) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरकार मान्यताप्राप्त चित्र अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साकारले आहे. २"x२" आकाराच्या मोरपंखावर अ‍ॅक्रिलिक रंगांच्या साहाय्याने ३.३ x ४.५ सें.मी. या लहानशा आकारात मिनिएचर शैलीत हे चित्र रंगविण्यात आले आहे.


या लघुरूप चित्रप्रकारात चोपड्यात प्रथमच अशा प्रकारचे चित्र साकारण्यात आल्याचे मानले जात आहे. या चित्रातून छत्रपतींचे राजपण, त्यांचा दरारा आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्व चेहऱ्यावर अत्यंत प्रभावीपणे साकारलेले दिसून येते. अतिशय बारकाईने आणि प्रचंड मेहनतीने हे चित्र पूर्ण करण्यात आले आहे. यावर्षी वेगळ्या आणि अनोख्या चित्रशैलीतून आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना अनिलराज पाटील यांनी आपल्या कलेतून अनोखे अभिवादन केले आहे. एआयच्या वाढत्या प्रभावाच्या काळातही पारंपरिक हस्तकला आणि कलाकारांची जिद्द आजही तितकीच सक्षम असल्याचे हे चित्र अधोरेखित करते.

No comments