adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या बॅनरची विटंबना; तीन तास रस्ता रोको आंदोलन

 फैजपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या बॅनरची विटंबना; तीन तास रस्ता रोको आंदोलन  इदू पिंजारी, फैजपूर (संपादक – हेमकांत गायकवाड) फैजपू...

 फैजपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या बॅनरची विटंबना; तीन तास रस्ता रोको आंदोलन 


इदू पिंजारी, फैजपूर

(संपादक – हेमकांत गायकवाड)

फैजपूर शहरातील भुसावळ रोडवरील छत्री चौकात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरची अज्ञात व्यक्तींनी फाडून विटंबना केल्याची घटना दिनांक १७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली. ही बाब १८ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे दहा वाजता उघडकीस येताच शहरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच संतप्त नागरिकांनी छत्री चौकात एकत्र येत तीव्र निषेध व्यक्त केला. आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी नागरिकांनी तब्बल तीन तास रस्ता रोको आंदोलन केले. “जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला दिला. दरम्यान, फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता काही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये आणखी नाराजी व्यक्त करण्यात आली.

हे आंदोलन सकाळी सुमारे १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू होते. या काळात भुसावळ–सावदा–यावल मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. पोलीस प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे व दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.या आंदोलनात महामंडलेश्वर जनार्दनजी महाराज, माजी उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी, नगरसेवक पवन सराफ, नगरसेवक महेंद्र मंडवाले, नगरसेवक अनंता नेहते, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, भाजप गटनेते सिद्धेश्वर वाघुळदे, नगरसेवक विनोद चौधरी, जितेंद्र भारंबे, भाजपाचे संजय रल, संजय सराफ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. घटनेमुळे फैजपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून आरोपींच्या लवकरात लवकर अटकेची मागणी होत आहे.

No comments