सार्वजनिक बांधकाम विभागात अनियमिततेचा संशय; विभागीय आयुक्तांकडून चौकशीचे आदेश हेमकांत गायकवाड यांच्या तक्रारीची अधिकृत दखल चोपडा प्रतिनिधी...
सार्वजनिक बांधकाम विभागात अनियमिततेचा संशय; विभागीय आयुक्तांकडून चौकशीचे आदेश
हेमकांत गायकवाड यांच्या तक्रारीची अधिकृत दखल
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि. १८ फेब्रुवारी – नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांविरोधात दाखल तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे संबंधित विभागात एकच खळबळ उडाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक (सामान्य प्रशासन विभाग) यांनी दिलेल्या अधिकृत पत्रानुसार, आर.आर. पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे यांच्या अखत्यारीत २०१४ पासून आजपर्यंत करण्यात आलेल्या सर्व कामांची दक्षता व गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच १६ ऑक्टोबर २०२५ रोजी अपील सुनावणीदरम्यान अर्जातील विषयांप्रमाणे माहिती देण्याचे आश्वासन देऊनही माहिती न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात प्रथम अपील अधिकारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतही उल्लेख करण्यात आला आहे.
अपील अर्ज दाखल करूनही अर्जदारास सुनावणीसाठी न बोलावणे, कोणताही पत्रव्यवहार न करणे व संबंधित माहिती मुद्दाम न देणे याबाबत जन माहिती अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच माहिती असतानाही अर्ज चुकीच्या कार्यालयात वर्ग केल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे. ही तक्रार हेमकांत बळीराम गायकवाड (पत्रकार), जळगाव जिल्हाध्यक्ष – ऑल इंडिया ब्लू टायगर सेना, चोपडा यांनी ई-मेलद्वारे सादर केली होती. दि. ०२/०२/२०२६, ०३/०२/२०२६ व ०८/०२/२०२६ रोजी प्राप्त तक्रार अर्जांच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयाने संबंधित विभागास नियमानुसार चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणातील पुढील कार्यवाहीकडे आता सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले असून, चौकशीतून नेमके काय निष्पन्न होते याकडे उत्सुकता आहे.

No comments