वसई विरार महानगरपालिकेच्या गेल्या पाच वर्षांतील सर्व विकासकामांचे ऑडिट करण्याची मागणी.. सामाजिक कार्यकर्ती रूचिता नाईक यांची महापौर अजिव पा...
वसई विरार महानगरपालिकेच्या गेल्या पाच वर्षांतील सर्व विकासकामांचे ऑडिट करण्याची मागणी..
सामाजिक कार्यकर्ती रूचिता नाईक यांची महापौर अजिव पाटील यांना निवेदन देऊन मागणी....
अमोल बावस्कार मुंबई
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नालासोपारा ता,२३ :- वसई विरार महानगरपालिके मार्फत गेल्या पाच वर्षांत विविध राज्य व केंद्र शासनाच्या योजना आणि महानगरपालिका विकास निधीमधून हजारो कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली. मात्र या कामांची गुणवत्ता निकृष्ट व रखडलेल्या असून अनेक प्रभाग आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे निदर्शनास आणु इच्छिते.
वसई विरार महानगरपालिका प्रशासकीय काळातील पाच वर्षात अनेक कामांचा निधी उपलब्ध होऊन हि अनेक कामे रखडलेल्या अवस्थेत आहेत, हा निधी काम न करताच कंत्राटदारांना देण्यात आला.
या करीता महानगरपालिकेने कडक पावले उचलण्याची गरज आहे. याची चौकशी व ऑडीट करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ती रूचिता नाईक यांनी महापौर यांच्याकडे केली.
यामध्ये वाढीव इस्टीमेट, निकृष्ट साहित्य, अनिमियता, समेळपाडा येथिल स्मशानभूमीत करोडो रूपये खर्च करून बसवण्यात आलेले विद्युत शवदाहिनी चालू न करताच पाच वर्ष धुळ खात पडुन खराब झाली आता परत करोडो रूपये खर्च करून नविन विद्युत शव दाहिनी बसवण्यात येत आहे.
समेळपाड्यातील गार्डन मध्ये सूशोभीकरणच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे कामे, नैसर्गिक नाले बुजवून भ्रष्टाचार तसेच विकासकामातील खर्च आणि प्रत्यक्ष काम यातील तफावत उघड होऊन आगामी काळातील भ्रष्टाचाराला आळा बसेल.
“गेल्या पाच वर्षांत विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला, परंतु वसई विरारकरांच्या हाती काहीच मिळाले नाही— उलट अनेक प्रकल्पांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.”
कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे बंद करुन प्रत्यक्षात कामाला महत्व देणे गरजेचे आहे. योग्य नियोजना अभावी दिलेला निधीचा उपयोग शहराच्या विकासासाठी होत नाही. अनेक ठिकाणी सुरु केलेल्या योजना बंद झाल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने दिलेला निधीचा अपव्यय झाला आहे. तरी याची चौकशी व ऑडीट करुन भविष्यात अशा पध्दतीने काम होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ती रूचिताताई नाईक यांनी महापौर अजीव पाटील साहेब यांच्या कडे केली आहे.


No comments