adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचा ‘वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्कार संग्रामपूरला

 अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचा ‘वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्कार संग्रामपूरला  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत ...

 अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचा ‘वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्कार संग्रामपूरला 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

संग्रामपूर:-  सह्याद्रीच्या कुशीत आणि सातपुड्याच्या सान्निध्यात पत्रकारितेची भक्कम परंपरा जपणाऱ्या संग्रामपूर तालुका पत्रकार संघाने राज्यस्तरावर मानाचा तुरा रोवला आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांचा प्रतिष्ठेचा ‘वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ’ पुरस्कार यंदा संग्रामपूर तालुक्याला प्रदान करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित भव्य समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला. राज्यातील तब्बल ३५५ तालुक्यांच्या स्पर्धेत संग्रामपूर तालुक्याने बाजी मारत अमरावती विभागातून हा मान मिळवणारा एकमेव तालुका ठरण्याचा बहुमान पटकावला.

या सोहळ्यास परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह दिग्गज पत्रकारांची उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचा सन्मानपत्र, मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील समस्या प्रभावीपणे मांडणे, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि विकासाभिमुख पत्रकारितेला चालना देणे या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे परिषदेने स्पष्ट केले. “सह्याद्रीच्या पायथ्याशी सातपुड्याचा सत्कार करताना विशेष आनंद होत आहे,” अशा भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या. या यशामुळे संग्रामपूरसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून पत्रकारितेच्या क्षेत्रात नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे.

No comments