adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल–भुसावळ–निमगाव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जीवितास धोका कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची आकाश चोपडे यांची मागणी

  यावल–भुसावळ–निमगाव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जीवितास धोका कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची आकाश चोपडे यांची मागणी  भरत को...

 यावल–भुसावळ–निमगाव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे जीवितास धोका

कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची आकाश चोपडे यांची मागणी 


भरत कोळी यावल 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल–भुसावळ–निमगाव दरम्यानच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात यावल पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर करण्यात आले असून संबंधित कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नीरज उर्फ आकाश चोपडे यांनी केली आहे. सदर रस्त्यावरून प्रवास करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या रस्त्याची अल्पावधीतच दुरवस्था झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिपत्रक क्रमांक नियंत्रण २०१७/प्र.क्र./नियोजन, दिनांक २७ एप्रिल २०१७ नुसार डांबरी रस्त्याचे आयुर्मान १५ वर्षे व काँक्रीट रस्त्याचे किमान ३० वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या कालावधीत रस्त्यावर खड्डे पडल्यास किंवा काम निकृष्ट दर्जाचे आढळल्यास संबंधित कंत्राटदार व पर्यवेक्षीय अधिकारी फौजदारी व दिवाणी कारवाईस पात्र ठरतात. तसेच या अटी करारनाम्यात नमूद करून कंत्राटदाराची सही घेणे बंधनकारक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

वरील शासन आदेशानुसार सदर रस्त्यावरील खड्डे हे संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या निष्काळजीपणाचे द्योतक असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारा हा प्रकार भारतीय दंड संहिता कलम ३०४(अ), ३३६, ३३७ व ३३८ अन्वये दंडनीय गुन्हा ठरतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार व पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांची नोंद घेऊन जबाबदारांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी ठाम मागणी आकाश चोपडे यांनी केली आहे.

No comments