adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जि.प. उर्दू शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद

 जि.प. उर्दू शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद  रावेर प्र...

 जि.प. उर्दू शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न

विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद 


रावेर प्रतिनिधी : मुबारक तडवी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आवडी-रुचीला चालना देणे व शिक्षण प्रक्रियेत आनंददायी वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या मेळाव्याचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक शेख नईम शेख इब्राहीम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाकीर मलिक व शिक्षकवृंद यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच सौ. अलकाताई बाळू महाजन यांच्या हस्ते झाले.

यावेळी माजी सरपंच मुबारक (राजू) अलीखा तडवी, बाळू श्रावण महाजन, शाकीर मलिक, बोहरी रिजवानाबाई अख्तर अली, सलीम खान समद खान, सैय्यद नजरुल इस्लाम, मुबीन अली तडवी, मकबूल खा, रमजान खा, जलील मोहम्मद, दोस्त मोहम्मद, वसिफुर रहेमान, रशीद तडवी, जुबेर सर तसेच शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


मेळाव्यात विद्यार्थ्यांनी स्वतः विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून विक्री केली. तसेच विविध खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गाणे व मनोरंजनात्मक उपक्रम सादर करण्यात आले. ग्रामस्थांनी विविध खाद्यपदार्थांचा मनमुराद आस्वाद घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची संधी मिळाली. खरेदी-विक्री, व्यवहारज्ञान, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढीस लागला. मेळाव्यामुळे शाळेच्या परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

प्रतिक्रिया :

१) सौ. अलकाताई बाळू महाजन, सरपंच

“बाल आनंद मेळावा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. अशा विविध उपक्रमांमुळे लहान मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होते. शिक्षणाबरोबरच आनंदही मिळतो, ही बाब विशेष महत्त्वाची आहे.”

२) शेख नईम शेख इब्राहीम, मुख्याध्यापक

“बाल आनंद मेळावा हा विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण देणारा उपक्रम आहे. यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, तसेच व्यावहारिक ज्ञानाची ओळख होते. खरेदी-विक्री, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ आदी माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

No comments