adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

छत्रपती संभाजीनगरात अर्थसंकल्प २०२६-२७ वर रक्षाताई खडसे व अतुल सावे यांचा माध्यमांशी संवाद

छत्रपती संभाजीनगरात अर्थसंकल्प २०२६-२७ वर रक्षाताई खडसे व अतुल सावे यांचा  माध्यमांशी संवाद  छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकां...

छत्रपती संभाजीनगरात अर्थसंकल्प २०२६-२७ वर रक्षाताई खडसे व अतुल सावे यांचा  माध्यमांशी संवाद 


छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 छत्रपती संभाजीनगर येथे अर्थसंकल्प 2026-27 विषयी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्री. अतुलजी सावे यांची पत्रकार परिषद संपन्न भारतीय जनता पार्टी जिल्हा  छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आज  विकसित भारत अर्थसंकल्प 2026-27 संदर्भात  केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे  व  महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्री. अतुलजी सावे  यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. 


या पत्रकार परिषदेत  केंद्र सरकारने  सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वसमावेशक व विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी ठोस तरतुदी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष योजना, युवकांसाठी रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी, उद्योजक व एमएसएमई क्षेत्राला चालना देणाऱ्या सवलती तसेच पायाभूत सुविधा, दळणवळण, आरोग्य व शिक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण तरतुदींची सविस्तर माहिती माध्यम प्रतिनिधींना देण्यात आली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे  व  महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्री. अतुलजी सावे  यांच्यासह जिल्हाध्यक्ष श्री. किशोर शितोळे, महानगरपालिका गटनेते श्री. गोविंद केंद्रे, श्री. समीर राजूरकर, शहर सरचिटणीस छायाताई खाजेकर, शहर सरचिटणीस श्री. हर्षवर्धन कराड, शहर सरचिटणीस श्री. ताराचंद गायकवाड, महिला मोर्चा शहराध्यक्ष उज्वलाताई दहीफडे तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  


No comments