adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथे आज प्रधानमंत्री घरकुल योजना शिबिर

 फैजपूर येथे आज प्रधानमंत्री घरकुल योजना शिबिर   इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  फैजपूर शहरातील गरजू नागरिकांना प्रधानमंत्...

 फैजपूर येथे आज प्रधानमंत्री घरकुल योजना शिबिर  


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 फैजपूर शहरातील गरजू नागरिकांना प्रधानमंत्री आवास (घरकुल) योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने आज दि.९ फेब्रुवारी रोजी देवीवाडा येथील साईबाबा मंदिराजवळील नगर परिषदेच्या बहुउद्देशीय सभागृहात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरासाठी अर्जदारांनी सिटी सर्वे उतारा उत्पन्न दाखला आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स तसेच आवश्यक कागदपत्रांसह सकाळी १० वाजता उपस्थित रहावे असे आवाहन नगरसेवक विनोद (पप्पू) चौधरी यांनी केले आहे. सदर शिबिर नगराध्यक्ष सौ.दामिनी सराफ उपनगराध्यक्ष निकिता कोळी प्रभागाच्या नगरसेविका दिपाली भारंबे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे तसेच सर्व सन्माननीय नगरसेवक नगरसेविका यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक पप्पू चौधरी व साई ग्रुप मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments