adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी तासगांव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला, तर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांची सातारला बदली!

 पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी तासगांव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला, तर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांची सातारला बदली!   सौ. शुभांग...

 पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी तासगांव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला, तर पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांची सातारला बदली! 


 सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी ( सांगली जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सांगली जिल्हा पोलीस दलात पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशावरून नुकत्याच दोन पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत  बदल्या करण्यात आल्या असून. यामध्ये तासगाव आणि मिरज ग्रामीण या पोलीस ठाण्यांना नव्या अधिकार नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सांगली जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक आणि तासगांव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रदीप सूर्यवंशी यांची नुकतीच सातारला बदली झाल्याने तासगांव पोलीस ठाण्याचा पदभार हा पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशावरून तासगांव पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्याकडूंन पदभार स्वीकारला आहे. तासगांव पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून प्रदीप सूर्यवंशी यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच विशेष मोहीम राबवून गुन्हेगारीवर चांगलेच नियंत्रण ठेवले होते. त्यांनी सांगली जिल्हा पोलीस दलात रुजू झाल्यापासून इस्लामपूर पोलीस ठाणे तसेच पोलीस मुख्यालयात विविध पदावर काम पाहिले आहे. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून त्यांना पोलीस खात्यात ओळखले जाते. तर नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी सांगली जिल्हा पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यात तसेच मुख्यालयात ही काम पाहिले आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देवुन पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्याकडे तासगांव पोलीस ठाण्याचा पदभार सोपविला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या बदलीनंतर ही तासगांव पोलीस ठाण्याला खमक्या अधिकारी मिळाल्याचे जनतेतून बोलले जात आहे.

No comments