adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

न.पा.प्रशासकीय कामाचे ऑडिट करून भ्रष्टाचार निर्मूलन करावे ॲड.गिरी व डॉ.पालीवाल यांचे विभागीय आयुक्त गेडाम यांना निवेदन

 न.पा.प्रशासकीय कामाचे ऑडिट करून भ्रष्टाचार निर्मूलन करावे ॲड.गिरी व डॉ.पालीवाल यांचे विभागीय आयुक्त गेडाम यांना निवेदन  जळगाव....(डॉ.अनिलकु...

 न.पा.प्रशासकीय कामाचे ऑडिट करून भ्रष्टाचार निर्मूलन करावे

ॲड.गिरी व डॉ.पालीवाल यांचे विभागीय आयुक्त गेडाम यांना निवेदन 


जळगाव....(डॉ.अनिलकुमार पालीवाल)..... जिल्ह्यात जळगाव शहर मनपासह सर्व नप ची गत प्रशासकीय काळातील कामकाजाचे ऑडिट करून त्यांच्या कार्यालयात दर्शनी भागात लावण्यात आलेले भ्रष्टाचार संबंधित फलक काही ठिकाणी काढून टाकण्यात आल्याने जनतेत पुनः हा संदेश देण्यासाठी सदरचे फलक पूर्ववत लावावेत,अशी मागणी करणारे निवेदन पाचोरा येथील ॲड.कालिदास गिरी व ज्येष्ठ पत्रकार डॉ.अनिलकुमार पालीवाल यांनी नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांना पाठवले आहे.

     सदर निवेदनात नप स्तरावर प्रशासकीय काळात ९९ वर्ष कराराने जागा बळकावण्याचे अनेक प्रकारचे आदेश खोट्या संस्थांच्या नावावर देण्यात आले असल्याबद्दल व आर्थिक भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झाले असल्याचा संशय व्यक्त केला आहे.तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील मनमानी कारभाराने त्रस्त केले होते.कोणालाही आपल्या रीतसर व योग्य कामासाठी लाच देऊ नये व कोणी मागत असल्यास त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी,असे आशयाचे लावलेले बोर्ड काही ठिकाणाहून गायब झालेत. ते बोर्ड पुन्हा लावण्याचे आदेश आयुक्त साहेबांनी द्यावेत व जनजागृती करावी, अशी मागणी निवेदनात ॲड. गिरी व डॉ.पालीवाल यांनी केली आहे.

No comments