adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

किनगाव ते श्री क्षेत्र मुक्ताई पायी दिंडीचे शिरसाड येथे यावल तालुका तहसीलदार मोहनमाला नाझीरकर मॅडम यांच्या हस्ते पूजन...

 किनगाव ते श्री क्षेत्र मुक्ताई पायी दिंडीचे शिरसाड येथे यावल तालुका तहसीलदार मोहनमाला नाझीरकर मॅडम यांच्या हस्ते पूजन...  भरत कोळी यावल (सं...

 किनगाव ते श्री क्षेत्र मुक्ताई पायी दिंडीचे शिरसाड येथे यावल तालुका तहसीलदार मोहनमाला नाझीरकर मॅडम यांच्या हस्ते पूजन... 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल:-  शिरसाड ग्रामपंचायतीचे मा.उपसरपंच तथा वि. का. सोसायटी संचालक धनंजय पाटील सर व आर.ई.पाटील सर व संपूर्ण पाटील परिवाराकडून किनगाव ते श्री क्षेत्र मुक्ताई पायी दिंडीचा स्वागत सोहळा व महाप्रसाद कार्यक्रम 10 फेब्रुवारी रोजी शिरसाड येथे राहत्या घरी संपन्न झाला. या दिंडीचे पूजन यावल तालुक्याच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर मॅडम यांच्या हस्ते झाले. यावेळी पाटील परिवाराचे व्याही लोंढवे ता.अमळनेर गावाचे लोकनियुक्त सरपंच अशोक पाटील यांनी वारकऱ्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला यावल नगरपरिषदेचे नगरसेवक, शेतकी संघाचे संचालक मंडळ, तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तथा तालुक्यातील भाविक भक्त उपस्थित होते. यावेळी शिरसाड गावातील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना दिंडीच्या निमित्ताने पाटील परिवाराकडून स्नेह भोजन देण्यात आले होते. तसेच यावल रावेर विधानसभेचे लोकप्रिय युवा आमदार अमोल दादा हरिभाऊ जावळे व चोपडा विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी दूरध्वनीवरून सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी सर्व मान्यवरांचे, वारकऱ्यांचे सर्व भक्त गणांचे कार्यक्रमाची शोभा वाढविल्याबद्दल यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे मा.उपसभापती तथा संचालक तेजस धनंजय पाटील यांनी आभार मानले.

No comments