फैजपूर शिव कॉलनीत त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी इदू पिंजारी (फैजपूर) (संपादक – हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील शिव कॉल...
फैजपूर शिव कॉलनीत त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
इदू पिंजारी (फैजपूर)
(संपादक – हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील शिव कॉलनी परिसरात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर जयंती मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीस नगरसेविका सौ. प्रियंका इंगळे व सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. एल. आगळे सर यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर माता रमाई आंबेडकर यांच्या तैलचित्रास लता सदानंद मेंढे व उपस्थित सर्व महिलांनी पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. अशोक भालेराव यांनी बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली तसेच प्रास्ताविक केले. यावेळी आर. एल. आगळे सर, माया ताई तायडे, आगळे मॅडम तसेच सामाजिक कार्यकर्त्या निर्मला अवसरमल यांनी आपल्या मनोगतातून माता रमाई आंबेडकर यांच्या त्यागमय जीवनावर प्रकाश टाकला.
यानंतर अशोक भालेराव यांनी आपल्या भाषणातून सामाजिक प्रबोधन केले. कार्यक्रमात लता सदानंद मेंढे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्यावर आधारित गीत सादर करून वातावरण उत्साहाने भारून टाकले, यावेळी उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमानंतर शिव कॉलनीतून माता रमाई आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत माता रमाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणा देत महिला व पुरुषांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या कार्यक्रमास शिव कॉलनी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, फैजपूर येथील असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते. यामध्ये नितीन इंगळे, लखन इंगळे, बाळू भालेराव, निळकंठ भालेराव, गिरिधर इंगळे, धिरज मेंढे, देविदास साळुंखे, जगदेव मेंढे, विजय तायडे, भूषण मेंढे, सुपा इंगळे तसेच प्रतिभा भालेराव, अलका मेंढे, कोकिळा मेंढे, ज्योती भालेराव, सुमित्रा इंगळे, स्वाती मेंढे, वैशाली मेंढे, कोमल मेंढे, माया तायडे, इंद्रायणी भालेराव, सरिता भालेराव, दुर्गा पारवे, पल्लवी मेंढे, मेघना अवसर, सुनीता आढाळे, निर्मला खंडाळे, प्रियंका नितीन इंगळे, मिलन तायडे, लिखिता साळुंखे, आशा इंगळे, पूजा केदारे, पुनम तायडे, मालिनी तायडे, लता तायडे, रेखा मेंढे, वसुंधरा मेंढे, मेश्राम ताई, हिवरे ताई आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी अशोक भालेराव यांनी उपस्थित महिलांचे विशेष कौतुक करत सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.


No comments