adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जातीय द्वेषातून डेप्युटी जीएसटी कमिश्नरवर खोटे गुन्हे दाखल..मागासवर्गीय समाजातील असल्यामुळे टार्गेट करण्याचा प्रयत्न विवेक घोडके यांचा गंभीर आरोप.. त्या वकील दांपत्यावर कारवाई न झाल्यास आरपीआय (गवई) गटाचा आंदोलनाचा इशारा सुशांत म्हस्के

 जातीय द्वेषातून डेप्युटी जीएसटी कमिश्नरवर खोटे गुन्हे दाखल..मागासवर्गीय समाजातील असल्यामुळे टार्गेट करण्याचा प्रयत्न विवेक घोडके यांचा गंभी...

 जातीय द्वेषातून डेप्युटी जीएसटी कमिश्नरवर खोटे गुन्हे दाखल..मागासवर्गीय समाजातील असल्यामुळे टार्गेट करण्याचा प्रयत्न विवेक घोडके यांचा गंभीर आरोप..

त्या वकील दांपत्यावर कारवाई न झाल्यास आरपीआय (गवई) गटाचा आंदोलनाचा इशारा सुशांत म्हस्के  


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-मी मागासवर्गीय समाजातील असल्यामुळेच आमच्यावर जाणीवपूर्वक जातीय द्वेषातून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत.असा गंभीर आरोप शहरातील पाईपलाईन रोड परिसरात वास्तव्यास असलेले व सध्या मुंबई येथे कार्यरत असलेले डेप्युटी जीएसटी कमिश्नर विवेक प्रभाकर घोडके यांनी पत्रकार परिषदेत केला.घोडके यांनी सांगितले की,महानगरपालिकेची विधिवत परवानगी घेऊन आपल्या घराचे बांधकाम सुरू केले असताना शेजारी राहत असलेल्या एका वकील दांपत्याकडून सातत्याने अडथळे निर्माण केले जात आहेत. बांधकामाच्या ठिकाणी येऊन कामगारांना शिवीगाळ करणे, धमक्या देणे व मारहाण करणे असे प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला.“आम्ही बंगला बांधत आहोत,चारचाकी गाडी वापरतो,त्यामुळे त्यांना आमचा विटाळ होतो.आमची प्रगती त्यांना खटकते,असे वर्तन संबंधितांकडून होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.विशेष म्हणजे 31 ऑक्टोबर 2025 रोजी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु “त्या दिवशी मी स्वतः घटनास्थळी उपस्थित नव्हतो.तरी देखील माझे नाव गुन्ह्यात टाकण्यात आले.संबंधित व्यक्तीला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नसताना खोटा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला,” असे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही खूप संघर्ष केल्याचे घोडके यांनी सांगितले की,संबंधित वकील कुटुंबाकडून होणाऱ्या जातीय अपमान,महिलांवर मारहाण, फोटो काढणे,घर बळकावण्याचा प्रयत्न अशा प्रकारांविरोधात त्यांनीही विविध तारखांना तक्रारी दिल्या आहेत.पोलीस संरक्षणासाठी वारंवार अर्ज करावे लागले असेही त्यांनी सांगितले.संबंधित व्यक्ती वकील असल्याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप करत त्यांनी Bar Council of Maharashtra and Goa तसेच नगर कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षांना भेटून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिल्याचे सांगितले.आमचे जगणे मुश्कील झाले आहे.जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली आहे,असा गंभीर आरोप त्यांनी केला.या प्रकरणी मागासवर्गीय अधिकारी असल्यामुळेच घोडके यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत Republican Party of India (Gavai) च्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी तीव्र भूमिका घेतली आहे.

“समोरची व्यक्ती वकील असल्याचा गैरफायदा घेत खोटे गुन्हे दाखल करत आहे.घोडके हे कामानिमित्त मुंबईत असतानाही त्यांच्या नावावर शहरात गुन्हे दाखल केले जात आहेत.जातीय द्वेषातून त्यांना घराजवळून हटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापुढे पुन्हा खोटे गुन्हे दाखल झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला. या संपूर्ण प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून,जातीय द्वेष,कायद्याचा गैरवापर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.संबंधित प्रकरणात पोलिस प्रशासन व न्यायव्यवस्था कोणती भूमिका घेणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments