adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मोफत शासकीय सेवा कॅम्प यशस्वी! ई-श्रम, मतदान व रेशन कार्ड दुरुस्ती — नागरिकांना मोठा दिलासा! प्रभाग क्र. १०, देशमुख वाडा, यावल नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

 मोफत शासकीय सेवा कॅम्प यशस्वी! ई-श्रम, मतदान व रेशन कार्ड दुरुस्ती — नागरिकांना मोठा दिलासा!  प्रभाग क्र. १०, देशमुख वाडा, यावल नागरिकांचा ...

 मोफत शासकीय सेवा कॅम्प यशस्वी! ई-श्रम, मतदान व रेशन कार्ड दुरुस्ती — नागरिकांना मोठा दिलासा!

 प्रभाग क्र. १०, देशमुख वाडा, यावल नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! 


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय अमोल दादा जावळे यांच्या प्रयत्नातून शासकीय योजनांमधील त्रुटी दूर करण्यासाठी मोफत सेवा कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पमध्ये ई-श्रम कार्ड, नवीन मतदान कार्ड दुरुस्ती, रेशन कार्ड दुरुस्ती तसेच शेतकरी ओळखपत्र आयडी संदर्भातील विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले. 


हा कॅम्प यावल येथील प्रभाग क्रमांक १०, देशमुख वाडा येथे पार पडला. कॅम्पचे आयोजन यावल नगरपालिका भारतीय जनता पार्टी च्या गटनेत्या सौ. नंदाताई महाजन व नगरसेवक योगेश चौधरी यांनी केले. कॅम्पला नरेंद्रजी महाराज, नगरसेवक हेमराज फेगडे, रोशन येवले, मुकेश कोळी, चेतन अढळकर, अमोल देशमुख, दीपक चौधरी, अतुल चौधरी, योगेश देशमुख (बापू), जितू कोलते, पराग देशमुख, रितेश बारी, उज्वल कानडे आदी सदस्य उपस्थित होते. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

No comments