adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हॉटेलच्या संदीपच्या मागे एलसीबीचा सापळा..! कमरेला गावठी कट्टा लावून फिरणारा तरुण ताब्यात

 हॉटेलच्या संदीपच्या मागे एलसीबीचा सापळा..! कमरेला गावठी कट्टा लावून फिरणारा  तरुण ताब्यात  सचिन मोकळं अहिल्यानगर संपादक हेमकांत गायकवाड  अह...

 हॉटेलच्या संदीपच्या मागे एलसीबीचा सापळा..! कमरेला गावठी कट्टा लावून फिरणारा  तरुण ताब्यात 


सचिन मोकळं अहिल्यानगर

संपादक हेमकांत गायकवाड 

अहिल्यानगर:-नेवासा तालुक्यातील वडाळा बहीरोबा येथे अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून जेरबंद केले.आरोपीकडून सुमारे ३० हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा (पिस्टल) जप्त करण्यात आला आहे.जिल्ह्यात अवैध शस्त्रांविरोधात कडक कारवाईचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे यांनी दिले होते.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते.या पथकात पोलीस अंमलदार राहुल द्वारके, दिपक घाटकर,लक्ष्मण खोकले, ह्रदय घोडके,सोमनाथ झांबरे, राहुल डोके आणि किशोर शिरसाठ यांचा समावेश होता. पथकाला नेवासा तालुक्यात अवैध शस्त्रांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.दि.२५ फेब्रुवारी २०२६ रोजी सोनई पोलीस ठाणे हद्दीत गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की प्रदिप जगधने (रा. वडाळा बहीरोबा,ता.नेवासा) हा गावात कमरेला गावठी कट्टा लावून फिरत आहे.माहितीच्या आधारे पथकाने हॉटेल संदिपच्या पाठीमागे सापळा लावला.

संशयित इसमास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रदिप मोहन जगधने (वय २१ वर्षे,रा.वडाळा बहीरोबा, ता.नेवासा,जि.अहिल्यानगर) असे सांगितले.झडती दरम्यान त्याच्या ताब्यातून ३० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र) जप्त करण्यात आले.या प्रकरणी पोकॉ/७८२ किशोर आबासाहेब शिरसाठ (स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाणे गु.र.नं. ७२/२०२६, आर्म अॅक्ट कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करत आहे.

No comments