भुईंज पोलिसांकडून दरोड्याचा कट उधळला, खेडशिवापूर येथील टोळी अखेर जेरबंद, 10 लाख 52 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत ! सौ. शुभांगी सरोदे-पुर...
भुईंज पोलिसांकडून दरोड्याचा कट उधळला, खेडशिवापूर येथील टोळी अखेर जेरबंद, 10 लाख 52 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत !
सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भुईंज पोलिसांनी पुणे सातारा महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत असणाऱ्या पेट्रोल पंपावरील कामगारांना लुटणाऱ्या आणि दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या चार संशयितांना भुईंज पोलिसांनी अखेर अटक केली आहे. त्यांच्याकडून जवळपास 10 लाख 52 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अमित बजरंग चव्हाण ( वय 28) युफियात मुस्तफ मुजाहिद (वय 19) संजय महादेव जाधव (वय 19 ) सर्व रा. खेडशिवापूर पुणे जिल्हा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. तर चौथा आरोपी हा विधीसंघर्षात बालक असल्याचे समजत आहे. तर एक संशयित आरोपी अंधारांचा फायदा घेत पळून गेला असून पोलीस त्याचाही शोध घेत आहेत. संशयित ताब्यात असलेल्या आरोपींकडून मेढा पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये डीपी चोरी गुन्हा उघडकीस आला आहे. डीपी चोरी घरफोडी पेट्रोल डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता तपासी अधिकाऱ्यांकडून वर्तवली जात आहे. सदरची कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील सहा. पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शिंदे व पोलिस अंमलदार सुशांत धुमाळ नितीन जाधव सोमनाथ बल्लाळ सागर मोहिते किरण निंबाळकर अजय सपकाळ अभिजीत वाघमळे यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता. भुईज पोलिसांच्या या दमदार कामगिरीबद्दल भुईंजच्या जनतेंतून तसेच सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विशेष कौतुक होत आहे.

No comments