सत्याचा मार्ग अवलंबा मनुष्य चंचलहृदयी निर्माण केला गेला आहे. जेव्हा त्याच्यावर संकट येते. तेव्हा तो घाबरून जातो व पालनकर्त्याचा धावा करतो ...
सत्याचा मार्ग अवलंबा
मनुष्य चंचलहृदयी निर्माण केला गेला आहे. जेव्हा त्याच्यावर संकट येते. तेव्हा तो घाबरून जातो व पालनकर्त्याचा धावा करतो आणि जेव्हा त्याला सुस्थिती लाभते, तेव्हा तो पालनकर्त्याला विसरतो. हे अल्लाह जाणून आहे. जे लोक नियमित नमाज अदा करतात, जे नमाजाचे नियमित पठण करतात,ज्यांच्या मालमत्तेत याचक व वंचित असलेल्यांचा, अनाथ व अपंगांचा एक ठरावीक हक्क आहे, जे कयामतच्या दिवसाला सत्याधिष्ठित मानतात, जे आपल्या पालनकर्त्याच्या प्रकोपाचे भय बाळगतात, जे दानधर्म करतात, गोरगरिबांची काळजी करतात, असे लोक अल्लाहला प्रिय आहेत. जीवनात नेहमी ते सुखी राहतील. शेवटी त्यांना स्वर्गप्राप्ती होईल. याउलट जे वागतात ते जीवनात कधी सुखी राहू शकत नाहीत. शेवटी त्यांना नरकाच्या आगीत ढकलले जाईल.म्हणून बांधवांनो, अल्लाहचे भय बाळगा. माता-पित्यांच्या सेवेत पुण्य हे बांधवांनो, आई-वडिलांचे मन कधी दुखवू नका. त्यांना कधी आपल्यापासून दूर ठेवू नका. त्यांचा आदर करा. ते जे सांगतात आपल्या भल्यासाठीच असते. त्यांचे कष्ट, प्रेम कायम लक्षात ठेवा. शेवटपर्यंत त्यांचा आधार व्हा. त्यांची काळजी घ्या. अल्लाहने या जगात सर्वांची व्यवस्था केली आहे. त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. असे कृत्य होऊ देऊ नका, यातच आपले कल्याण सामावले आहे. जो कुणी असे कृत्य करीत असेल त्याला त्याची शिक्षा जरूर मिळेल. अल्लाहसर्व पाहात आहे. त्याच्याकडे चांगल्या- वाईटाची नोंद आहे. त्यामुळे जीवन जगतअसताना सरळ मार्ग पत्करा. सकारात्मक विचार ठेवा. खरे बोला, सर्वांशी प्रेमाने वागा. आई वडिलांची सेवा करा.
अब्दुल सरदार पटेल
चोपडा, जि. जळगाव
मो. 8766747092

No comments