जे टी. महाजन स्कूल, यावल येथे शिवजयंती उत्साहात साजरी भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : आज दिनांक 18/02/2026 रोजी व्यास शि...
जे टी. महाजन स्कूल, यावल येथे शिवजयंती उत्साहात साजरी
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : आज दिनांक 18/02/2026 रोजी व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन स्कूल, यावल येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षस्थानी असलेल्या सौ. रंजना महाजन मॅडम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे मॅडम उपस्थित होत्या. तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. गौरी भिरूड मॅडम व श्रीमती राजश्री लोखंडे मॅडम यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या प्रारंभी सेमी मीडियम व इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनकार्याविषयी माहिती सादर केली. साकेत अभिजीत जाधव, स्वराज मंदार गडे, गार्गी धनराज तळेले, विवेक योगेश लावणे, ओवी विशाल महाजन, तनिष्का प्रवीण चौधरी, प्रितेश प्रशांत बरगे, निखिल श्रीकृष्ण नेहते, समृद्धी निलेश बारी, कल्याणी पंकज बारी, महेश्वरी सुनील कुंभार आणि सुदिक्षा दिनकर बारी या विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे केली. तसेच सम्यक सौरभ जैन यांनी शिवरायांवरील प्रेरणादायी गीत सादर केले.
ऋषी नितीन माहूरकर, वेदांत अमृत पाटील व गायत्री सचिन चौधरी यांनी “शिवगर्जना” सादर करून वातावरण भारावून टाकले. हेमाक्षी मनोज पाटील, अंकिता जगदीश गायकवाड व धनश्री राजेंद्र पाटील यांनी जोशपूर्ण पोवाडे सादर केले. विद्यार्थ्यांनी शिवराय, जिजामाता व मावळे यांची आकर्षक वेशभूषा सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे मॅडम तसेच शिक्षिका डिंपल इंगळे मॅडम यांनीही शिवचरित्राविषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रीती भंगाळे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन लक्ष्मी कवडीवाले मॅडम यांनी मानले. अशा रीतीने शिवजयंतीचा हा कार्यक्रम शाळेत अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

No comments