adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा उत्साहात संपन्न

 यावल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा उत्साहात संपन्न  भरत कोळी यावल : (संपादक -:- हेमकांत गायकवा...

 यावल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा उत्साहात संपन्न 


भरत कोळी यावल :

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यशोगाथा अकॅडमी, यावल यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. या स्पर्धेचा विषय “शिवरायांचा इतिहास” असा असून, यावल तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे आयोजन इंदिरा गांधी इंग्लिश मीडियम स्कूल, यावल येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी शिवरायांना अभिवादन करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. स्पर्धा परीक्षा ही ५० गुणांची असून ती बहुपर्यायी प्रश्न (MCQ) स्वरूपात घेण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

ही स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली :

पहिला गट : इयत्ता ४ थी ते ६ वी

दुसरा गट : इयत्ता ७ वी ते ९ वी

यंदा विशेष बाब म्हणजे, उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या सत्रात स्वतंत्र परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना अधिक सोयीचे ठरेल म्हणून प्रश्नपत्रिका उर्दू भाषेत देण्यात आली. या स्पर्धेत १७० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावल शहरातील विविध शाळांमधून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी इंदिरा गांधी उर्दू गर्ल्स स्कूल, यावल येथील मुख्याध्यापिका मुमताज मॅडम यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. यावेळी शाळेतील शिक्षकवृंद आय. एल. शेख, आय. ए. शेख, एन. एम. शेख, आय. एच. खान, मरियम बानू, गुलनाज बानू, फहीम शेख, हर्षद खान, शेख सलीम यांनी विशेष सहकार्य केले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी आर. आर. शेख, शेख काबिल व इतर सर्व कर्मचारीवृंद यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. तसेच सर सैयद अहमद खान उर्दू स्कूल, यावल येथील जाविद सर यांनीही विशेष सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी विभागात कार्यरत असलेले प्रवीण भिमटे सर, भूषण धनगर, मयूर महाजन, कुणाल पाटील, मयूर पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच यशोगाथा अकॅडमीचे समस्त शिक्षक व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. ही स्पर्धा गेल्या चार वर्षांपासून यशोगाथा अकॅडमीचे संचालक उमेश धनगर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, गुण, कर्तृत्व व इतिहासाबद्दल प्रेरणा निर्माण होत असून स्पर्धा परीक्षेचा अनुभव मिळत असल्याने हा उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत उपयुक्त ठरत आहे. एकूणच हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला असून उपस्थित शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी व आयोजकांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

No comments