adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी च्या विशेष कृती दला सोबत शेतकरी कृती समितीचे एस बी पाटील यांची चर्चा ....

  शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी च्या विशेष कृती दला सोबत शेतकरी कृती समितीचे एस बी पाटील यांची चर्चा  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गाय...

 शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी च्या विशेष कृती दला सोबत शेतकरी कृती समितीचे एस बी पाटील यांची चर्चा 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

... शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आयुक्तालयाने पुढाकार घेऊन विशेष कृती दलाची(टास्क फोर्स) स्थापना केली त्यांचे अध्यक्ष श्री रफीक नाईकवाडी( संचालक,विस्तार व प्रशिक्षण)व सदस्य श्री  सुनील बोरकर (संचालक,आत्मा) यांच्या सोबत शेतकरी कृती समितीच्या वतीने एस बी पाटील यांनी चर्चा केली व त्यात राज्यातील बँकांनी रिझर्व्ह बँकेचे मास्टर सर्क्युलर RBI/2015-16/68

FIDD. No. FSD. BC.01 /05.10.001/2015-16 July 01, 2015 नुसार आजपर्यंत कधीही नैसर्गिक आपत्तीच्या काळात नियम न पाळल्याने आज शेतकऱ्यांचे आत्महत्या  वाढवल्यात व त्यांचा सिबील देखील बँकांनी खराब केला,बँकांनी त्याचे पालन करावे यासाठी मा.उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाने त्यांचे PIl/05/2016 मध्ये दि./07/2017चे अंतरिम आदेश दिले आहेत,फक्त त्याची अंमलबजावणी झाली तरी शासनावरील खूप मोठा भार कमी होईल व आत्महत्या कमी होतील.

   शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून काढणीसाठी शेतकरी चळवळींनी खूप भांडून पिक विमा  योजना सुरू करायला सरकारला भाग पाडले होते,त्या योजनेत देखील दुरुस्ती ची गरज असताना, परंतु लबाड चोरांच्या भीतीने त्यातील प्रमुख तीन ट्रिगर रद्द केल्याने योजनेतील आत्माच काढून घेतला,आताची योजना म्हणजे राष्ट्रीय नुकसान NDRF/SDRF चे नुकसान भरपाईचे निकष एवढाच आहे,फक्त त्यात पीकविमा कंपनी असा अजून एक भागीदार वाढला एवढाच आहे.त्यासाठी खरीप /रब्बी पीक विमा योजना पूर्ववत करावे,त्यातील काही दुरुस्ती देखील दलाला सुचवल्या.अन्यथा आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढतील अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली.

  तसेच योग्य निविष्ठांचा व कीटकनाशकांचा मर्यादित वापर करून उत्पादन कसे वाढेल यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणेसाठी विशेष मोहीम राबविण्यात यावा,तसेच त्यातील बोगस खते ,बियाणे व कीटकनाशक यांचेवर बंधन आणून उत्पादन खर्च कमी कसा होईल यासाठी प्रयत्न करणे बाबत देखील चर्चा झाली.

  कृती दल याबाबत अजून सर्विस्तर चर्चा करणेसाठी वेळ देणार आहे,जेणेकरून सरकारला चांगला अहवाल देता येईल असा विश्वास अध्यक्ष नाईकवडी यांनी व्यक्त केला.यावेळी डॉ मेघना केळकर(कृषी सहसंचालक),श्री बाबासाहेब जेजुरकर(कृषी सहसंचालक)  हे हजर होते व त्यांनी देखील चर्चेत भाग घेतला.

No comments