adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगाव प्रादेशिक परिवहन(आरटीओ) कार्यालयातील लेखाधिकारी प्रकरण गाजले दीपककुमार गुप्ता यांच्यासह अनेक तक्रारदारांच्या निवेदनानंतर चौकशी; बदलीची शिफारस

 जळगाव प्रादेशिक परिवहन(आरटीओ) कार्यालयातील लेखाधिकारी प्रकरण गाजले दीपककुमार गुप्ता यांच्यासह अनेक तक्रारदारांच्या निवेदनानंतर चौकशी; बदलीच...

 जळगाव प्रादेशिक परिवहन(आरटीओ) कार्यालयातील लेखाधिकारी प्रकरण गाजले

दीपककुमार गुप्ता यांच्यासह अनेक तक्रारदारांच्या निवेदनानंतर चौकशी; बदलीची शिफारस 

दीपककुमार गुप्ता
(सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता)

जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव:– प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथील लेखाधिकारी सतीश महाजन यांच्या कामकाजाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर चौकशी करण्यात आली असून, संबंधित अधिकाऱ्यांची बदली करण्याची शिफारस वरिष्ठांकडे करण्यात आल्याची माहिती अधिकृत पत्रव्यवहारातून समोर आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी,जळगाव कार्यालयाकडून परिवहन आयुक्त,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांना पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार,माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार पी.गुप्ता (रा.जळगाव) यांच्यासह सुनील गुजर,राजेंद्र बुवा,मोहम्मद बुवा,प्रवीण मेहरे,जयकर राहुल,अनिस पांडे,लालसिंग तडवी,विनोद बोरेकर,सुरेश पाटील,विजय मेढे,अतुल पाटील,राजधर महाजन,हेमकांत गायकवाड व तौसिफ राजा शेख यांनी दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी ई-मेलद्वारे तक्रार नोंदविली होती.

या तक्रारींच्या अनुषंगाने सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड यांच्यामार्फत सखोल चौकशी करण्यात आली.चौकशी अहवालात लेखाधिकारी सतीश महाजन व तक्रारदार दीपककुमार गुप्ता यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे नमूद करण्यात आले आहे.या वादामुळे कार्यालयातील शिस्त बिघडल्याचे तसेच कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाल्याचे अहवालात नमूद आहे.

याशिवाय संबंधित वादाचा ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने परिवहन विभागाच्या प्रतिमेला धक्का बसल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.तसेच एका शासकीय वाहनाच्या तपासणीप्रकरणी दंडाची रक्कम आकारण्यात आल्याची बाबही अहवालात नमूद आहे.

वरील सर्व बाबींचा विचार करून,सतीश महाजन यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याऐवजी त्यांची अन्यत्र बदली करण्यात यावी व त्यांच्या जागी नवीन लेखाधिकारी नियुक्त करण्यात यावा,अशी शिफारस करण्यात आली आहे.यामुळे कार्यालयातील कामकाज सुरळीत होईल,असा विश्वास पत्रात व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान,या प्रकरणामुळे जळगाव आरटीओ कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून,आता अंतिम निर्णयासाठी वरिष्ठ स्तरावरील आदेशाची प्रतीक्षा आहे.

No comments